हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Fourth Mumbai। मुंबईच्या वाढत्या पायाभूत सुविधांचा भार हलका करण्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील असते. मुंबईत इन्फ्रास्ट्रक्चरची कामे विक्रमी पातळीवर सुरु असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे. मुंबईवरील बोजा कमी करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराभोवती चौथी मुंबई विकसीत केली जात असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. हॉटेल ताज पॅलेस येथे बँक ऑफ अमेरिकातर्फे आयोजित ‘ २०२५ इंडिया कॉन्फरन्समध्ये : एक्सेलेटरिंग ग्रोथ, महाराष्ट्रा @वन ट्रिलीयन’ या कार्यक्रमात ते बोलत होते.
विमानतळ उभारणार, बुलेट ट्रेनलाही जोडणार- Fourth Mumbai
देवेंद्र फडणवीस म्हणाले, चौथी मुंबई’ ही (Fourth Mumbai) संकल्पना वाढवण बंदराभोवती विकसित केली जात आहे. याठिकाणी भारतातील सर्वात मोठे बंदर आणि नवीन विमानतळ उभारले जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विमानतळ उभारणीसाठी मंजुरी दिली आहे. एवढच नव्हे तर मुंबई -अहमदाबाद बुलेट ट्रेन आणि मुंबई कोस्टल रोड वाढवणं बंदरापर्यंत घेऊन जाण्याचा प्लॅन आहे. हा भाग एक मोठं शहरी केंद्र बनेल असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला. या एकूण प्रोजेक्टमुळे मुंबईचे महत्व अजिबात कमी होणार नाही, किंवा मुंबईमधील व्यवसायांवरही त्याचा परिणाम होणार नाही, उलट या विस्तारांचा उद्देश मुंबई आणि चौथ्या मुंबईदरम्यान, लोकांचं येणं- जाणं सोप्प व्हाव आणि वस्तूंची ने- आण सुलभ व्हावी हाच आहे हे सांगायलाही फडणवीस विसरले नाहीत.
मुंबईच्या आर्थिक वर्चस्वाला धोका नाही –
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हि गोष्टही स्पष्ट केली कि, मुंबईच्या आर्थिक बळकटीला आणि वर्चस्वाला कोणताही धोका नाही. सुरत डायमंड बोर्सच्या उदयानंतर आर्थिक घडामोडी आणि व्यापार मुंबईबाहेर स्थलांतरित होऊ शकतात असा जो एक सूर आवळला जातोय तो सुद्धा फडणवीसांनी फेटाळून लावला. उलट मुंबईच्या डायमंड ट्रेडिंग झोनमधील मालमत्तेच्या किमती दोन वर्षांत ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत असं आकडेवारीतून स्पष्ट होत असल्याचं त्यांनी सांगितलं. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) हे फिनटेक आणि व्यावसायिक गुंतवणुकीचे केंद्र राहिले आहे. मुंबईचे वित्तीय सेवा क्षेत्र जागतिक आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे. त्यामुळेभारतातील सर्वोच्च व्यावसायिक केंद्र म्हणून मुंबईचे स्थान मजबूतच राहील असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.