FPI ने फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय बाजारातून काढले 14,935 कोटी रुपये

0
49
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी म्हणजेच FPIs ने फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात भारतीय बाजारातून 14,935 कोटी रुपये काढले आहेत. सलग चौथ्या महिन्यात FPची विक्री झाली आहे.

डिपॉझिटरी डेटानुसार, 1 ते 11 फेब्रुवारी दरम्यान, FPIs ने इक्विटीमधून 10,080 कोटी रुपये, कर्ज विभागातून 4,830 कोटी रुपये आणि हायब्रीड इंस्ट्रुमेंट्स मधून 24 कोटी रुपये काढले आहेत. अशा प्रकारे त्यांची एकूण रक्कम 14,935 कोटी रुपये झाली आहे.

हिमांशू श्रीवास्तव, असोसिएट डायरेक्टर (मॅनेजर रिसर्च), मॉर्निंगस्टार इंडिया म्हणाले, “अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने नरम आर्थिक भूमिका सोडण्याचे संकेत दिल्यानंतर FPI विक्री वाढली आहे. यूएस मध्यवर्ती बँकेने व्याजदर वाढीचे संकेत दिल्यानंतर जागतिक स्तरावर बाँडवरील उत्पन्न वाढले आहे.”

यूएस महागाई 40 वर्षांच्या उच्चांकावर
श्रीवास्तव म्हणाले की,”अमेरिकेतील महागाई 40 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. अशा स्थितीत अमेरिकेची मध्यवर्ती बँक येत्या काही महिन्यांत आक्रमकपणे व्याजदर वाढवू शकते. यामुळे भारतीय शेअर्समधून विदेशी निधीचा फ्लो आणखी वाढू शकतो.”

उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये संमिश्र प्रवाह
कोटक सिक्युरिटीजचे इक्विटी रिसर्च (रिटेल) प्रमुख श्रीकांत चौहान म्हणाले की,”फेब्रुवारीमध्ये आजपर्यंत उदयोन्मुख बाजारांचा कल संमिश्र होता.” ते म्हणाले की,”या काळात थायलंड, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया आणि फिलीपिन्समध्ये अनुक्रमे 115.5 कोटी डॉलर्स, 58 कोटी डॉलर्स, 47.7 कोटी डॉलर्स आणि 13.3 कोटी डॉलर्स गुंतवणुकीचा फ्लो झाला आहे. दुसरीकडे, या काळात तैवानमधुनकडून 4.1 कोटी डॉलर्स पैसे काढण्यात आले आहेत.”

जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य फायनान्शिअल इन्व्हेस्टर व्ही. के, विजयकुमार म्हणाले, “जागतिक बाजारपेठेतील कमकुवत कल आणि यूएसमधील 10 वर्षांच्या बॉण्डवरील उत्पन्नात झालेली वाढ यामुळे आगामी काळात FPI ची विक्री सुरू राहील.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here