FPI ने सप्टेंबरमध्ये आतापर्यंत केली 21,875 कोटी रुपयांची गुंतवणूक, ‘हे’ आहे आकर्षणाचे कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPI) सप्टेंबरमध्ये आतापर्यंत भारतीय बाजारपेठेत 21,875 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. डिपॉझिटरी आकडेवारीनुसार, 1 ते 23 सप्टेंबर दरम्यान परदेशी गुंतवणूकदारांनी 13,536 कोटी रुपये इक्विटीमध्ये आणि 8,339 कोटी रुपये डेट किंवा बाँड मार्केटमध्ये टाकले. अशा प्रकारे त्यांची निव्वळ गुंतवणूक 21,875 कोटी रुपये होती. यापूर्वी ऑगस्टमध्ये FPI ने भारतीय बाजारपेठेत 16,459 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

मॉर्निंगस्टार इंडियाचे सहयोगी संचालक (संशोधन) हिमांशू श्रीवास्तव म्हणाले,”भारतीय शेअर बाजारातील तेजी, दीर्घकालीन सकारात्मक दृष्टीकोन, आर्थिक पुनरुज्जीवन आणि कॉर्पोरेट कमाईतील रिकव्हरीची शक्यता विदेशी गुंतवणूकदारांना भारतीय शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत आहे.”

याशिवाय चीनमध्ये झालेल्या घसरणीचा भारतालाही फायदा झाल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे भारताला दीर्घकालीन दृष्टीकोनातून विदेशी गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचे एक आकर्षक ठिकाण बनले आहे. जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्ही के विजयकुमार म्हणाले, “MSCI वर्ल्ड इंडेक्स आणि MSCI EM इंडेक्सच्या तुलनेत निफ्टीची कामगिरी प्रभावी राहिली आहे, ज्यामुळे भारतीय बाजारपेठांकडे FPI चे आकर्षण वाढले आहे.”

श्रीकांत चौहान, कार्यकारी उपाध्यक्ष (इक्विटी तांत्रिक संशोधन), कोटक सिक्युरिटीज म्हणाले कि,”इतर उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये, तैवानला एकूण $ 148.2 कोटी गुंतवणूक मिळाली आहे. दक्षिण कोरिया, थायलंड, इंडोनेशिया आणि फिलिपिन्समध्ये गुंतवणूकीचा ओघ अनुक्रमे 122.3 कोटी डॉलर्स, 35.8 कोटी डॉलर्स, 26.8 कोटी डॉलर्स आणि 3.8 कोटी डॉलर्स होता.”