कोट्यावधीची फसवणूक : कालिकाई व अॅग्रो मल्टिस्टेटच्या तिघांना पोलिस कोठडी

Satara LCB
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | ठाणे येथे स्थापन झालेल्या कालिकाई व संपर्क अॅग्रो मल्टिस्टेट या कंपनीने हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केली. याबाबत तक्रारी आल्यानंतर सातारा आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या संचालक मंडळातील पसार असलेल्या तिघांना मुंबई येथून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

कमलाकर गंगाराम गोरिवले (वय- 56), अविनाश परशुराम डांगळे (वय- 52), विनोद सहदेव जगताप (वय- 59) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. सुमा गौतम माने व अन्य गुंतवणूकदारांनी या कंपनीत गुंतवणूक केली होती. गुंतवणूक केल्यानंतर कालावधी संपल्यानंतरही गुंतवलेली रक्कम परत न केल्याने पोलिस प्रमुखांकडे तक्रार दिली होती. कंपनीचे कोअर कमिटी सदस्य जितेंद्र यादव, चेअरमन अरुण गांधी, संचालक हेमंत रेड्डीज, मानसी रेड्डीज, आदित्य रेड्डीज, अभिनंदन गांधी, कमलाकर गोरिवले, अविनाश डांगळे, विनोद जगताप यांनी फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले होते.

यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणाची पाळेमुळे याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी कमलाकर गोरिवले, अविनाश डांगळे, विनोद जगताप या तिघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या कारवाईत पोलिस निरीक्षक डी. एस. पवार, पोलिस उपनिरीक्षक पी. आर. उमाप, अंमलदार प्रमोद नलावडे, प्रशांत नलावडे, निलेश चव्हाण, संतोष राऊत यांनी सहभाग घेतला