कॅप्टनच ठरला दिल्लीचा व्हिलन, पंतच्या ‘त्या’ दोन चुकांमुळे दिल्ली प्ले ऑफ मधून बाहेर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएल 2022 च्या प्ले-ऑफसाठीच्या चारही टीम आता ठरल्या आहेत. गुजरात, राजस्थान, लखनऊ या तीन टीम अगोदरच प्ले ऑफमध्ये पोहोचल्या होत्या. तर चौथ्या टीमसाठी दिल्ली आणि आरसीबी यांच्यात स्पर्धा होती. या दोन्ही टीमचे भवितव्य मुंबईवर अवलंबून होते. मुंबईविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा विजय झाला असता तर ते प्ले-ऑफमध्ये पोहोचले असते, पण मुंबईने दिल्लीला हरवल्यामुळे आरसीबी प्ले-ऑफमध्ये पोहोचली. आरसीबीने या मोसमात 14 पैकी 8 मॅच जिंकल्या आणि 6 मॅचमध्ये त्यांचा पराभव झाला, तर दिल्लीने 14 पैकी 7 मॅचमध्ये विजय मिळवला आणि तेवढ्याच मॅच त्यांनी गमावल्या. मुंबईविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने (Rishabh Pant) केलेल्या चुका टीमला चांगल्याच महागात पडल्या, ज्यामुळे त्यांना प्ले-ऑफमध्ये प्रवेश करता आला नाही.

पहिली चूक – ब्रेविसचा कॅच सोडला
या सामन्याच्या 12 व्या ओव्हरमध्ये कुलदीप यादवच्या बॉलिंगवर पंतने (Rishabh Pant) डेवाल्ड ब्रेविसचा अगदी सोपा कॅच सोडला, त्यावेळी ब्रेविस 22 बॉलमध्ये 25 रनवर खेळत होता. हे जीवनदान मिळाल्यानंतर ब्रेविसने 12 रन केले. यानंतर शार्दुल ठाकूरने ब्रेविसला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 33 बॉलमध्ये 37 रन करून ब्रेविस पॅव्हेलियनमध्ये परतला.

दुसरी चूक – पंतने डीआरएस घेतला नाही
दिल्लीचा कर्णधार आणि विकेट कीपर असणाऱ्या ऋषभ पंतने (Rishabh Pant) टीम डेव्हिडला पहिल्याच बॉलला जीवनदान दिलं. शार्दुल ठाकूरच्या बॉलिंगवर टीम डेव्हिडच्या बॅटच्या एजला लागून बॉल ऋषभ पंतच्या हातात गेला, यानंतर पंतने अपीलसुद्धा केले. पण त्याला दिल्लीच्या इतर खेळाडूंनी साथ दिली नाही, त्यामुळे पंतने डीआरएस घेतला नाही. रिप्लेमध्ये डेव्हिडच्या बॅटला बॉल लागल्याचं स्पष्ट दिसत होतं. हा रिप्ले बघितल्यानंतर दिल्लीच्या खेळाडूंसह पंतनेही डोक्याला हात लावला. ऋषभ पंतने डेव्हिडच्या पहिल्याच बॉलला डीआरएस घेतला असता, तर मॅचचं चित्र कदाचित वेगळं असतं. या जीवदानाचा फायदा घेत टीम डेव्हिडने 11 बॉलमध्ये 309.09 च्या स्ट्राईक रेटने 34 रनची वादळी खेळी करून मुंबईला विजय मिळवून दिला. हि चूक ऋषभ पंतला खूप महागात पडली.

हे पण वाचा :

तुम्हाला नवाबभाई चालतात पण मुन्नाभाई चालत नाहीत…; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

केतकी चितळेचा अभिमान वाटतो ; सदाभाऊ खोत यांचे केतकीला समर्थन

वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेत्यांना ब्रेक लागणे कठीण, अपघात अटळ आहे; फडणवीसांच्या सभेनंतर राऊतांचे ट्विट

उद्धवजी, तुमच्या सत्तेचा बाबरी ढाचा मी खाली पाडणार; देवेंद्र फडणवीसांचा करारा जवाब

 

Leave a Comment