तब्बल दोन कोटीची फसवणूक : फलटणच्या कपडे व्यावसायिकाला कामगारांनी गंडवले

Falthan City Police
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फलटण | फलटण येथील कपडे व्यावसायिकाच्या गारमेंट किंग प्लस नावाच्या दुकानातील कामगारांनी किंमत 1 कोटी 97 लाख 50 हजार 255 रुपयांचा अपहार केल्या प्रकरणी चार जणांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिेलेल्या माहितीनुसार, 2018 पासून ते आज पर्यंत वेळोवेळी फिर्यादी सुमित हणमंराव जगदाळे (वय- 38 वर्षे व्यवसाय कापड व्यापारी रा. मुळ रा . बिदाल ता. माण जि. सातारा हल्ली रा. बंगला नंबर 13 राधिका गार्डन कोळकी ता. फलटण जि . सातारा) व व्यवसाईक भागीदार धोंडीराम घाडगे यांचे मालकीचे गारमेंट किंग प्लस शाखा फलटण या दुकानामध्ये काम करण्यास असलेले सुनिल मच्छिद्र दोरगे ( रा. यवत ता. पुरंदर जि. पुणे ) व प्रसाद प्रकाश पंडीत ( दुकान अंकाऊट, रा. वडुज ता. खटाव जि. सातारा ) यांनी फिर्यादी मालक यांचा विश्वास संपादन करून दुकानातील विवीध कंपनीचे व विवीध ब्रॉन्डचे लहान मोठया पुरुष महीला व बालकाचे शेकडो कपडयाचे एकुण 1 लाख 50 हजार बारकोड (वस्तु आवक) पैकी 45 हजार 530 वस्तुचे बारकोड हे दुकानाचे बिलींग सिस्टीम मधुन डिलीट करुन यापैकी काही माल पुसेगाव येथील नितीन फडतरे यांच्या मालकीचे वैष्णवी कलेक्शन मध्ये तसेच गंगाखेड जि. परभणी येथील सुरेश आचमे यांच्या मालकीचे राज भगीरथ नावाचे कापड दुकानात एकुण किंमत 1 कोटी 90 लाख 94 हजार 809 एवढे रक्कमेचा अपहार केलेला माल विक्री केला.

तसेच सुनिल मच्छिद्र दोरगे व प्रसाद प्रकाश पंडीत दोघांनी बिलद्वारे विकलेल्या मालांपैकी ग्राहकांकडून येणारे एकुण बाकी 6 लाख 55 हजार 446 रुपये हे दुकाणाचे अकाऊंटला जमा न करता स्वतःकडे ठेवले सदर यामध्ये एकुण किंमत 1 कोटी 97 लाख 50 हजार 255 रुपये एवढे रक्कमेचा फिर्यादी सुमित हणमंराव जगदाळे यांची फसवणूक केल्या प्रकरणी फिर्यादी मालक यांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राऊळ करीत आहेत.