RBI ने पैशाच्या ट्रान्सझॅक्शन बाबतचा ‘हा’ नियम बदलला, आता 2 लाखांऐवजी तुम्ही 5 लाख रुपये ट्रान्सफर करू शकाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर तुम्ही देखील इंटरनेट बँकिंगद्वारे पैशाचे ट्रान्सझॅक्शन करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. रिझर्व्ह बँकेने IMPS (Immediate Payment Service) द्वारे केलेल्या ट्रान्सझॅक्शनची मर्यादा वाढवली आहे. आता 2 लाख रुपयांऐवजी तुम्ही एका दिवसात 5 लाख रुपये ट्रान्सफर करू शकाल. म्हणजेच आता ऑनलाईन फंड ट्रान्सफर करणे सोपे झाले आहे.

RBI ने ग्राहकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतला आहे. आता RTGS ची वेळ 24X7 झाली आहे म्हणजेच तुम्ही RTGS द्वारे कोणत्याही वेळी ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करू शकता.

NEFT द्वारे फंड ट्रान्सफर करण्यासाठी मिनिमम लिमिट नाही
NEFT द्वारे फंड ट्रान्सफर करण्यासाठी मिनिमम लिमिट नाही म्हणजे तुम्ही किती पैसे ट्रान्सफर करू शकता. दुसरीकडे, जर आपण जास्तीत जास्त मर्यादेबद्दल बोललो तर ते बँकांनुसार बदलू शकते.

RTGS आणि IMPS द्वारे किती पैसे ट्रान्सफर केले जातात
NEFT व्यतिरिक्त, ग्राहक RTGS आणि IMPS वापरून पैसे ट्रान्सफर करू शकतात. RTGS बद्दल बोलताना, याद्वारे, एका वेळी 2 लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम ट्रान्सफर केली जाऊ शकत नाही तर जास्तीत जास्त रकमेची लिमिट वेगवेगळ्या बँकांमध्ये वेगवेगळ्या आहे. IMPS द्वारे, एका दिवसात 2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम रिअल टाइममध्ये ट्रान्सफर केली जाऊ शकते, जी वाढवून 5 लाख रुपये करण्यात आली आहे.

रेपो दर 4% वर कायम
शुक्रवारी तीन दिवसांच्या बैठकीनंतर RBI चे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले,”RBI ने रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर 4% आणि रिव्हर्स रेपो दर 3.35% वर कायम आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील मॉनिटरी पॉलिसी कमिटी (MPC) ने 22 मे 2020 रोजी शेवटचा रेपो दर बदलला.

Leave a Comment