हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Airtel : आजकाल ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु आहे. अशातच कंपन्या एकापेक्षा एक प्लॅन सादर केले जात आहेत. Airtel कडून काही प्लॅनमध्ये Amazon Prime Mobile Edition चे फ्री सबस्क्रिप्शन दिले जात आहे. Amazon प्रीपेड प्लॅन ज्यामध्ये हा लाभ दिला जातो त्यांची किंमत 359 ते 999 रुपये आहे आणि त्यांची व्हॅलिडिटी 28 दिवसांपासून ते 84 दिवसांपर्यंत आहे.
या प्लॅन्समध्ये फक्त प्राइम मोबाइल एडिशनचे सबस्क्रिप्शनच मिळत नाही, तर त्यामध्ये आणखी बरेच फायदे दिले गेले आहेत. अशा परिस्थितीत, एअरटेलच्या कोणत्या प्लॅनमध्ये एअरटेल मोबाइल एडिशनचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जाते आणि त्यामध्ये इतर कोणते फायदे आहेत ते जाणून घेऊयात…
Airtel चा 359 रुपयांचा प्लॅन
कंपनीच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना डेली 2 GB डेटा आणि 100 SMS दिले जातात. या प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवसांची आहे. तसेच ग्राहकांना त्यामध्ये Amazon Prime Mobile Edition, Xstream Mobile Pack, Apollo 24/7 Circle चे सबस्क्रिप्शन दिले जाते. यामध्ये ग्राहकांना अनलिमिटेड फ्री कॉलिंगची सुविधा देखील मिळते.
Airtel चा 699 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेली 3 जीबी डेटा दिला जातो. त्याची व्हॅलिडिटी 56 दिवस आहे. यामध्ये ग्राहकांना Amazon Prime Mobile Edition, Xstream Mobile Pack सबस्क्रिप्शन दिले जाते. या प्लॅनमध्ये FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक आणि Apollo 24/7 Circle चे सबस्क्रिप्शन फ्रीमध्ये उपलब्ध आहे.
Airtel चा 999 रुपयांचा प्लॅन
या प्लॅनमध्ये ग्राहकांना डेली 2.5 जीबी डेटा दिला जातो. याबरोबरच अनलिमिटेड कॉलिंग आणि 84 दिवव्हॅलिडिटी देखील मिळते. यामध्ये ग्राहकांना Amazon Prime Mobile Edition, Xstream Mobile Pack दिले जाते. यासोबतच FASTag च्या कॅशबॅक सारख्या ऑफर्स देखील देण्यात आल्या आहेत.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.airtel.in/recharge-online
हे पण वाचा :
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
Bank FD : आता ‘या’ 2 बँकांनी आपल्या फिक्स्ड डिपॉझिट्सवरील व्याजदरात केली वाढ, नवे दर पहा
ई-तिकीटिंग सिस्टीम आणखी वेगवान करण्यासाठी Railway कडून सल्लागार कंपनीची नियुक्ती !!!
Milk Price : देशाच्या इतर भागांच्या तुलनेत ‘या’ शहरामध्ये कमी दराने मिळते दूध !!!