फुकट बिर्याणी क्लिप माझ्यावरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे षडयंत्र : पोलिस उपायुक्त प्रियांका नारनवरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | पुण्यातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याची फुकट बिर्याणीची ऑडिओ क्लिप चांगलीच व्हायरल होत आहे. सदरील ऑडिओ क्लिपमधील व्हायरल झालेला प्रकार गंभीर आहे. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या प्रकाराची चाैकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांने ऑडिओ क्लिप म्हणजे बदली करण्याच्या प्रकारातून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे एक षडयंत्र असून ती व्हायरल झालेली क्लिप माझी नसून मी सायबर क्राईमकडे तक्रार करणार असल्याचे स्पष्टीकरण पोलिस उपायुक्त प्रियांका नारनवरे यांनी सांगितले आहे.

प्रियांका नारनवरे म्हणाल्या, या प्रकाराची अजून चौकशी झालेली नाही. गृहमंत्री साहेबांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. त्यात जे सत्य आहे, ते बाहेर येईल. तसंच मी स्वत:ही तक्रार दाखल करणार आहे. चौकशी होऊ द्या. त्यातून सगळं कळेल. पोलीस विभागाची गरिमा राहावी म्हणूनच मी इथे आल्यापासून प्रामाणिकपणे काम करत आहे. जे चुकीचे लोकं होते त्यांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न केला, सरळ करण्याचा प्रयत्न केला. जे चुकीचे प्रकार होत होते ते थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज माझ्या नावाने हे व्हायरल केलं गेलं आहे. माननीय गृहमंत्रीसाहेब बोलले आहेत आणि चौकशी योग्यरितीने झाली तर ते शक्य होईल. खात्यात अंतर्गत राजकारण असल्याने हा प्रकार केल्याचा आरोप केला आहे. तसेच काही वरिष्ठ लोकांचाही यामध्ये हात आहेत. माझ्याच कार्यालयातील काही कर्मचारी यामध्ये सहभागी असून वातावरण खराब होत आहे.

काय म्हणातायतं महिला अधिकारी कर्मचाऱ्यांला ऑडिओ क्लिपमध्ये ऐका

https://www.facebook.com/1506067669510655/videos/857040568549003

जवळपास 5 मिनिटांची ही ऑडिओ क्लिप आहे. त्यात डीसीपी मॅडम मटण बिर्याणी, प्रॉन्स आणि अजून एका नॉन व्हेज भाजीची ऑर्डर द्यायला आपल्या कर्मचाऱ्याला सांगत आहेत. त्यांना हे सगळं एका चांगल्या हॉटेलमधून हवं आहे. हे पदार्थ जास्त तेलकट, तिखटही नको आहेत. त्याचबरोबर त्याची चव चांगली असावी असाही त्यांचा हट्ट आहे. या डीसीपी मॅडम फक्त ऑर्डर देऊन थांबल्या नाहीत. तर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी आपल्या हद्दीतील हॉटेलमध्ये पैसे का द्यायचे? असा सवालही केलाय. तो कर्मचारी मात्र यापूर्वी आपण नेहमी पैसे देऊनच खाद्यपदार्थ आणल्याचं सांगतोय. अशावेळी मॅडम महोदय त्या कर्मचाऱ्याला सर्व खाद्यपदार्थ फुकट आणण्यासाठी बजावत असल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळत आहे.

Leave a Comment