सातारा | सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, नवी दिल्ली विभागामार्फत जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद सातारा यांच्या संयुक्त प्रयत्नाने 60 व त्यापुढील वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय वयोश्री योजनेंतर्गत मोफत सहाय्यक साधने वाटपासाठी तपासणी शिबिर तसेच दिव्यांग बंधू-भगिनींसाठी एडीप योजनेंतर्गत कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने यांच्या मोफत वाटपासाठी पूर्वतपासणी नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी दिली आहे.
या कॅम्पमध्ये त्यांना उपयोगी साधने मोफत दिली जाणार आहेत. सदर कॅम्पमध्ये उपस्थित राहण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. तरी जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी व जेष्ठ नागरिकांनी सदरील योजनेचा लाभ घ्यावा.
सदरची नोंदणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता जर आपण ग्रामीण भागामध्ये राहत असाल तर ग्रामपंचातीच्या आपले सरकार सेवा केंद्र येथून विहित नमुन्यात अर्ज करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला (एक लाख ८० हजार पेक्षा कमी), आधार कार्ड, रेशन कार्ड हि कागदपत्रे आवश्यक आहेत. तरी आवश्यक कागदपत्रे घेवुन नोंदणी करावी. भारतीय कृत्रिम अवयव निर्मिती निगम तर्फे हालचालीसाठी सहाय्यक साधने – प्रौढांसाठी व्हील चेअर, लहानांसाठी व्हील चेअर, तीन चाकी सायकल, तीन चाकी सायकल, कुबडी, चालण्याची काठी, सेरेब्रल पाल्सीमध्ये उपयोगी साधने – सीपी खुर्ची, दृष्टीदोषामध्ये उपयोगी साधने – ऑडिओ प्लेयर, स्मार्टफोन, स्मार्ट केन, ब्राइल्ले स्लेट, श्रवणदोषामध्ये उपयोगी साधने – डिजिटल हेअरिंग मशीन, बौद्धीक दिव्यांग व्यक्तींना उपयोगी साधने – अभ्यासउपयोगी विविध डिजिटल उपकरणे, कृत्रिम हात, पाय, वृद्ध व्यक्तींसाठी उपयोगी साधणे – चालण्याची काठी, चालण्यासाठी वॉकर, चष्मा, खुर्ची यासह विविध साधने देण्यात येणार आहेत.
जिल्ह्यात 15 ते 28 डिसेंबरला कधी, कुठे कॅम्प पहा खाली
1) सातारा – 15 डिसेंबर जेष्ठ नागरिक तर 16 डिसेंबर दिव्यांग नागरिक
2) कराड – 17 डिसेंबर दिव्यांग नागरिक तर 18 डिसेंबर जेष्ठ नागरिक
3) फलटण – 19 डिसेंबर दिव्यांग नागरिक तर 20 डिसेंबर जेष्ठ नागरिक
4) वाई – 21 डिसेंबर दिव्यांग नागरिक तर 22 डिसेंबर जेष्ठ नागरिक
5) महाबळेश्वर – 23 डिसेंबर दिव्यांग नागरिक तर 24 डिसेंबर जेष्ठ नागरिक