हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आयपीएलच्या (IPL) सुरुवातीच्या काळात जिओकरून (Jio) आपल्या ग्राहकांसाठी अनेक खास ऑफर्स लॉन्च करण्यात आल्या होत्या. यात मोबाईल रिचार्ज प्लॅन्सपासून ते व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या सबस्क्रिप्शनचाही समावेश होता. मात्र आता जिओ एका खास ऑफर्सच्या बदल्यात ग्राहकांकडून पैसे आकारण्याचा विचार करत आहे. याबाबत जिओ कंपनीकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी याचे संकेत जिओनेच दिले आहेत.
नुकताच Jiocinema ने आपल्या X अकाउंटवर एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये सतत दिसणाऱ्या जाहिरातींमुळे लोक त्रस्त झालेले दिसत आहेत. यालाच पर्याय म्हणून जिओ येत्या 25 एप्रिल रोजी ॲड-फ्री सबस्क्रिप्शन लॉन्च करणार आहे. ज्यात फॅमिली प्लॅनचाही समावेश असणार आहे. त्यामुळे आता जिओ सिनेमावर मूव्ही असो किंवा आयपीएल विना जाहिरातींशिवाय पाहता येणार आहे. या प्लॅनमुळे जिओ सिनेमाच्या प्रेक्षकांच्या मनोरंजनात कोणताही अडथळा येणार नाही.
पैसे आकारले जाणार?
सध्या Jiocinema वर प्रेक्षकांना आयपीएल विनामूल्य पाहता येत आहे. परंतु पुढे जाऊन जिओ ही सेवा बंद करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. कारक की, सध्या जिओ सिनेमा दोन प्रकारचे प्लॅन ऑफर करत आहे. यात 999 रुपयांचा वार्षिक प्लॅन आहे. तर दुसरा 99 रुपयांचा मासिक प्लॅन आहे. परंतु या प्लॅनमध्ये देखील प्रेक्षकांना फ्री ऍड आयपीएल पाहता येत नाही. यावरच तोडगा काढत जिओ 25 एप्रिलपासून ॲड-फ्री सबस्क्रिप्शन आणत आहे. हे सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर प्रेक्षकांना कोणत्याही जाहिरातींशिवाय आयपीएल पाहता येईल. थोडक्यात, आता इथून पुढे Jiocinema वर ॲड-फ्री आयपीएल पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींना पैसे मोजावे लागणार आहेत.