हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने महिलांसाठी लालपरीच्या प्रवासी भाड्यात 50 टक्के सवलत चालू केली आहे. सरकारच्या या योजनेमुळे एसटीच्या महिला प्रवाशांची संख्या जास्त वाढली आहे. तसेच त्याचा एसटी महामंडळाला देखील फायदा होताना दिसत आहे. त्यामुळेच आता राज्य सरकारने आणखीन एक योजना आणली आहे. या योजनेमुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांना एसटीचा मोफत प्रवास करता येणार आहे.
मोफत सवलतीच्या अटी पुढीलप्रमाणे असतील:
सर्व प्रकारच्या बसेस भाड्यामध्ये महिलांना 50 टक्के सूट देण्यात आली आहे. साधी, छोटी बस, निमआराम, नॉन – अॅडजस्टेबल स्लीपर, शिवशाही, शिवनेरी, शिवाई अशा सर्व बसेस मध्ये महिलांसाठी ही सवलत लागू असणार आहे.
तसेच महिलांसाठी सवलतीच्या तिकिटांचा रंगही वेगळा असणार आहे. यात प्रवासी भाडे आणि अपघात निधीवर जीएसटी लागू असेल.
या योजनेमुळे महिलांना राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये कुठेही प्रवास करता येईल. परंतु बाहेर राज्यांत जायचे असल्यास त्यासाठी वेगळे भाडे मोजावे लागेल. महिलांसाठी ही सूट फक्त महाराष्ट्राच्या सीमेपर्यंतच मर्यादित असेल.
तसेच, 5 ते 12 वयोगटातील मुलींना 50% सवलत मिळेल. तसेच, वृद्धांना मोफत एसटीचा प्रवास करता येईल. जर प्रवाशांना आरक्षणाच्या तिकिटावर प्रवास करायचा असेल तर त्यांना ही सूट लागू होणार नाही.