एकनाथ खडसेंच्या पक्षांतरानंतर भाजपनं आयोजित केलेल्या बैठकीला रक्षा खडसेंची दांडी; चर्चेला उधाण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव। एकनाथ खडसेंच्या पक्षांतरानंतर आयोजित करण्यात आलेल्या जळगावातील भाजप बैठकीला खासदार रक्षा खडसे अनुपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर डॅमेज कंट्रोलची चाचपणी करण्यासाठी जळगाव जिल्हा भाजपच्या कोअर कमिटीची ही बैठक होत असल्याची माहिती आहे. भाजपच्या या तातडीच्या बैठकीला माध्यमांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. बैठकीचे कारण अद्याप अस्पष्ट असून पक्षसंघटनेच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी बैठक होत असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे. (MP Raksha Khadse absent at BJP meeting in Jalgaon)

भाजपच्या जळगाव जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीसाठी माजी मंत्री गिरीश महाजन, प्रांत संघटन मंत्री विजय पुराणिक, विभागीय संघटन मंत्री किशोर काळकर, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, मंगेश चव्हाण, माजी आमदार स्मिता वाघ, महापौर भारती सोनवणे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील आदी नेते उपस्थित आहेत.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहणार असल्याचे जाहीर केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे त्यांच्या मूळगावी कोथळी येथे आल्यानंतर रक्षा खडसे यांनी त्यांचे स्वागत केले होते.

एकनाथ खडसे यांना भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर जळगाव जिल्ह्यात भाजपची पहिलीच बैठक होत आहे. खडसेंनी जळगावमध्ये परतल्यानंतर बैठका घ्यायला सुरूवात करुन अ‌ॅक्शन मोडमध्ये असल्याचे दाखवून दिले होते. गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला असणाऱ्या जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढत्या ताकदीला रोखण्यासाठी भाजप काय पावलं उचलते यावर सर्वांचे लक्ष लागून आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment