‘जोपर्यंत गरज आहे तोपर्यंतचं आरक्षण लागू राहिले पाहिजे’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठं विधान

पुणे । राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज आरक्षणाबाबत मोठे विधान केले आहे. देशाला पुढे नेण्यासाठी समाजातील विषमता मिटवावी लागेल. त्यासाठी समतेचे समर्थक असलेल्या व्यक्तींना सोबत घेऊन जाताना मनातील भावामध्ये परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आरक्षणासाठीसुद्धा कायदे झाले आहेत. मात्र त्याचा लाभ सर्वांना मिळू शकत नाही आहे. ज्यांचे जिथे वर्चस्व आहे. तेच आरक्षणाचा लाभ घेत आहेत. मात्र समाजामध्ये जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत आरक्षण लागू राहिले पाहिजे. आरक्षणाला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे. पुण्यात झालेल्या दत्तोपंत ठेंगडी जन्मशताब्दी समारंभात सामाजित समरसता या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत आपले विचार मांडताना सरसंघचालकांनी हे विधान केले.

मोहन भागवत यांनी सांगितले की, सामाजिक समरसतेसाठी आपल्या आचरणामध्ये बदल घडवून आणला पाहिजे. हे आपल्याला करून दाखवावे लागेल. देश व्यापणारी विषमता उखडून टाकण्यासाठी समाजात परिवर्तन घडवून आणावे लागेल. सरसंघचालक पुढे म्हणाले की, ज्या लोकांना देशाचे तुकडे करायचे आहेत त्यांना समाजात ऐक्य प्रस्थापित होणे सहन होणार नाही. क्रांतीच्या मार्गाने समाजात समरसता आणता येणार नाही. घटनात्मक मार्गानेच समाजातील समस्यांवर तोडगा काढणे शक्य आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. समतेशिवाय समरसता प्रस्थापित होणे शक्य नाही. त्यासाठी आपल्याला तयार राहिले पाहिजे. त्यासाठी झुकावे लागले तरी मी मागे हटणार नाही. जे वरच्या स्तरावर आहेत त्यांना झुकावे लागेल आणि जे खाली आहेत त्यांना हात पुढे करावा लागेल, तेव्हाच समाजाचा उद्धार होईल, असे सरसंघचालकांनी सांगितले.

समाजात समरसता आणण्यासाठी आपल्या आचरणाचे उदाहरण लोकांसमोर ठेवावे लागेल. आधी करून नंतर दुसऱ्याला सांगावे लागेल. संघाचे स्वयंसेवक हे काम करत आहेत. सामाजिक समरसता मंचच्या लोकांनाही हे काम करावे लागेल. आपण सर्वांनी मिळून मिसळून सण, उत्सव साजरे केले पाहिजेत. आपली भाषा सुधारली पाहिजे. न्यायाच्या बाजूने उठणाऱ्या आवाजाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे, असे सरसंघचालक म्हणाले. दरम्यान, संपूर्ण समाज आपला आहे हा भाव घेऊन काम केले पाहिजे. मात्र काम करायचे आहे. घटनेची प्रस्तावना सर्वांच्या आचरणात यावी यासाठी वाणीचा दिवा पेटवून समरसता लोकांच्या हृदयात उतरवली पाहिजे, असे सरसंघचालक म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com