‘या’ कारणामुळे जिवलग मैत्रिणीनेच केली मैत्रिणीची चाकूने भोसकून हत्या

मृतक विद्या चंद्रकांत तळेकर
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । विकलेल्या स्कुटीच्या पैशावरून झालेल्या वादानंतर एका मैत्रिणीनेच मैत्रिणीची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील सेंट्रल नाका परिसरातील आलंतमश कॉलोनी भागात घडली. विद्या चंद्रकांत तळेकर असे मृत महिलेचे नाव आहे तर शकीला उर्फ निलोफर शेख असे पोलिसांनी अटक केलेल्या महिला आरोपीचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

शहरातील जिन्सी पोलीस ठाण्याचे पो.निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक विद्या आणि शकीला दोन्ही जुन्या मैत्रिणी होत्या. दोघां मैत्रिणींमध्ये बहिणीसारखे एकमेकींवर जीवापाड प्रेम होते. ८ महिन्यांपूर्वी विद्याचे लग्न झाले होते. तेव्हापासून विद्या खूप खुश होती. काही दिवसांपूर्वी नवीन मोपेड घेतल्याने विद्याने जुनी स्कुटी शकीलाला विकली होती. मात्र तिचे पैशे विद्याला दिले नव्हते. विकलेल्या स्कुटीच्या पैशासाठी काल रात्री विद्या ही शकीलाच्या घरी सेंट्रल नाका भागात गेली होती.त्यावेळी दोन्ही मैत्रिणी मध्ये स्कुटीच्या पैशाच्या देवाण-घेवाणी वरून वाद झाला . या वादावादी दरम्यान संतापाने शकीलाने घरातील धारदार चाकू विद्याच्या पोटात छातीत आणि मांडीवर भोसकले सुमारे चार ते पाच वार केल्यानंतर विद्या रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली व तिचा जागीच मृत्यू झाला.

यानंतर शकीलाने विद्याच्या भावाला कॉल करून तिचा अपघात झाल्याची माहिती देत विद्याला खाजगी रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले त्यानंतर शकीला काहीतरी लपवत असल्याचा संशय आल्याने नातेवाईकांनी शकीलाला बेदम मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शकीलाला अटक केली तिच्या विरोधात हत्येचा गुन्हा जिन्सी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.