हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत सक्तीचे करण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीत गायनाने व्हावी, असे निर्देश सर्व महाविद्यालयांना देण्यात आले आहेत, याबाबत महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी १९ फेब्रुवारी रोजी म्हणजेच शिवजयंतीपासून होईल, अशी माहिती राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
दिवसाच्या कामकाजाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्याबाबतचे निर्देश देणारे पत्र सर्व महाविद्यालयांना पाठवण्यात आले आहे. त्यास सर्वच महाविद्यालयांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून या निर्णयामुळे दर दिवशी १५ लाख विद्यार्थी राष्ट्रगीत म्हणतील. असा निर्णय घेणारं महाराष्ट्र हे देशातलं हे पहिलं राज्य असणार असंही सामंत यांनी पुढे नमूद केलं आहे.
Maharashtra minister Uday Samant: Maharashtra government to make singing national anthem in colleges compulsory from 19th February. pic.twitter.com/c4eiPLxLih
— ANI (@ANI) February 12, 2020
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.