हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात कोरोना व्हायरसने दहशत पसरवली आहे. त्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरकार ही घेता येईल तेवढी खबरदारी घेताना दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात मंगळवारी पहाटे 5 वाजता विधिवत पूजा करून तुळजा भवानीचे भाविकांसाठी दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. आजपासून देवीचे मंदिर सरकारचे पुढील आदेश येईपर्यंत बंद असेल.
तसेच तुळजाभवानी देवीची चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द करण्यात आली आहे. देवीचे मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी धार्मिक विधी व पूजा या महंत व पुजारी यांच्याकडून करण्यात जाणार आली. कोरोनाची ही परिस्थिती पाहता गर्दी टाळण्यासाठी मंदिर संस्थानने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान पहाटे देवीची पूजा करण्यात आली व त्यांनतर सर्व भक्तांच्या वतीने देवीच्या मूर्तीवर एक अभिषेक घालण्यात आला. देवीच्या धार्मिक पूजा व विधी हे देवीचे महंत व पाळीकर व 4 पेक्षा जास्त पुजारी उपस्थित राहणार नाहीत, याची दक्षता मंदिर संस्थानने घेतली आहे. देवीची चरण तीर्थ , प्रक्षाळ पूजा व अभिषेक पूजा व सिंहासन पूजेचा लाभही भक्तांना मिळू शकला नाही. कोरोनामुळे मंदीर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आल्याने भाविकांनी दर्शनासाठी बंद येऊ नये असे आवाहन मंदीर संस्थांच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी दीपा मुंडे यांनी केले आहे. मंदिर बंद असल्याने भक्त बाहेरूनच दर्शन घेत आहेत.