Monday, February 6, 2023

हुश्श! सातार्‍यातील ‘त्या’ कोरोना संशयिताचा रिपोर्ट निगेटिव्ह पण…

- Advertisement -

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोरोनाने सध्या जगभरात थैमान घातले असून सातार्‍यातही कोरोनाचा एक रुग्न सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र सदर कोरोना संशयिताचा आज मेडिकल रिपोर्ट आला असून तो निगेटिव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सातारकरांनी आता हुश्श म्हणत निश्वास सोडलाय.

- Advertisement -

रविवारी संध्याकाळी सातारा जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला संशयित सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. सदर संशयित सातारा जिल्हा रुग्नालयात असून त्याची चाचणी घेण्यात आली होती. आता त्याचे पुण्याहून रिपोर्ट आले असून ते निगेटिव्ह असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सदर युवक अबुधाबीवरून साताऱ्यात आला होता. युवकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी दुबई येथून प्रवास करून आलेली सातारा जिल्ह्यातील 6 वर्षीय मुलगी विलगीकरण कक्षात भरती झाली आहे. कोरडा खोकला असल्यामुळे तिच्या घश्यातील स्त्रावाचा नमुना पुणे येथील NIV कडे पाठवला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक अमोद गडीकर यानी दिली आहे.

सातारा जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या मोबाइलवर मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा Hello News

हे पण वाचा –

या’ देशात चीनपेक्षा जास्त वेगाने पसरतोय कोरोना! २४ तासात सापडले ३५९० रुग्न

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात! कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा..

धक्कादायक! पोलीस पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

हुश्श…! कोरोनासोबतच्या लढाईत भारत यशस्वी ; उपचारानंतर ११ रुग्ण ठणठणीत

पत्नीला कोरोनाव्हायरस झाल्यामुळे पंतप्रधान जस्टीन त्रुडो करणार ‘वर्क फ्रॉम होम’

डॉक्टर कडे न जाता करोनाव्हायरस मधून बऱ्या झालेल्या महिलेचा अनुभव! तिच्याच शब्दात

मोठी बातमी! अमेरीकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची घोषणा