औरंगाबाद | सम्यक विद्यार्थी आंदोलनच्यावतीने गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. विद्यापीठातील वाय पॉईंट मुख्य प्रशासकीय इमारतीपर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.
पीएचडी ऑनलाइन प्रक्रियेस मुदतवाढ देण्यात यावी, एम. फिल / पीएचडीचे जून चे राहिलेले प्रबंध जमा करण्यास 31 डिसेंबर 2019 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी, विद्यापीठातील वसतिगृह सुरू करण्यात यावे, कमवा शिका योजना तात्काळ सुरू करावी, ऑनलाइन परीक्षेतील निकालाबाबत झालेला गोंधळ दूर करण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
‘गेल्या दोन वर्षापासून covid-19 तिच्या महामारीमुळे विद्यापीठातील विविध प्रश्न समोर आलेले आहेत व आपलं विद्यापीठ हे शेतकरी कष्टकरी व मजूर यांच्या पाल्यांसाठी काम करते असे आपण महाराष्ट्रभर व देशभर आपण ठोक पणे सांगत असतो म्हणून विद्यार्थी केंद्रबिंदू समजून आपल्या समोर ज्या मागण्या ठेवत आहोत तसेच मराठवाडा हे प्रांत अगोदर पासून मागासलेलं आहे. आपल विद्यापीठ हे कष्टकरी शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी काम करते म्हणून हे ब्रीदवाक्य प्रमाणे वागून विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम करावे’. आणि या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असा इशारा प्रकाश इंगळे (महासचिव प्रदेश महाराष्ट्र सम्यक) यांनी विद्यार्थी दिला आहे.
यावेळी महासचिव महाराष्ट्र प्रदेश प्रकाश इंगळे, औरंगाबाद शहराध्यक्ष संकेत कांबळे, नागसेन वानखेडे, रोहित जोगदंड, ऋषिकेश कांबळे, अनिल दिपके, राहुल खंदारे, अविनाश सावंत, अमोल घुगे, रवींद्र गवळी, सुनील वाघमारे, विजय धनगर, भगवान चोपडे विनोद आघाव, अनिल जाधव, हर्षपाल खाडे, सोनाजी गवळी, जयश्री शिरके आदींसह सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.