औरंगाबाद : येथील एका 24 वर्षीय मुलाने बनावट वेबसाईट बनवून 56 लाखांचे गंडा घातला. गॅस एजन्सीचे अमिष दाखवून हा प्रकार घडला आहे. वाळूज मधील एका व्यावसायिकाला 56 लाखांचा चुना लावणाऱ्या सायबर भामट्याला 9 महिन्याच्या तपासानंतर अखेर गजाआड करण्यात आले आहे.भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन कंपनीची गॅस एजन्सी देण्याचे आमिष दाखवून पैसे लुबाडून तो कोट्यधीश झाला होता. पकडलेला भामटा हा चोवीस वर्षांचा असून त्यानी बनावट वेबसाइट तयार करून तीन राज्यातील अनेक लोकांना टोप्या घालत कोट्यावधी रुपये लुटल्याचे पोलीस तपासात समोर आली आहे.
तब्बल सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस एम कादरी यांनी दिले आहे. या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील नितीन जाधव यांनी काम पाहिले आहे. अ आरोपीचे नाव नितीशकुमार जितेंद्र प्रसाद सिंग (24 रा. हतीयारी बिमनवान काशी चौक, नालंदा बिहार) आहे. या गुन्ह्यात यापूर्वी काल शेख नेश मोहम्मद उर्फ शहाजहान, मोहम्मद अहसान रजा मोहम्मद ताहेर अलम उर्फ करीम, राजनकुमार नवल किशोर प्रसाद आणि बिनोद कुमार सिंह रामजी या चौघांना अटक करण्यात आली आहे.
वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये चांगदेव सोमीनाथ तांदळे यांची रविकिरण इंटरप्रायजेस नावाची कंपनी आहे. 1 ऑगस्ट 2019 रोजी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या गॅस एजन्सीची जाहिरात आली होती. या जाहिरातीद्वारे या आरोपीने तांदळे यांना 56 लाख 64 हजार 700 रुपयांचा गंडा घातला होता.
आरोपीच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन फसवणुकीतून आलेली रक्कम विनोद कुमार आणि अंकित यांच्याकडे पाठवली जात होती. या बदल्यात ते आमच्याकडून चढ्या भावाने फळे खरेदी करत असत. फोन कॉल करून बनावट वेबसाइट तयार करणे आणि संगणक संबंधीची सर्व कामे नितीशकुमार करतो. नितीशकुमार हा पश्चिम बंगालमधून सिम कार्ड खरेदी करतो व त्याचा वापर ऑनलाइन फसवणूक करण्यासाठी करतो. आरोपी नितीशकुमार यांच्याकडून रंजनकुमार यांच्या मध्यस्थीने पैसे मिळत होते.