एफआरपी 14 दिवसांच्या आतच, 60.20.20 अशी तीन टप्प्यात अमान्य : बळीराजा संघटनेची निदर्शने

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी

केंद्र सरकारसह राज्य शासनाकडून शेतकर्‍यांना एकरकमी एफआरपी देण्याऐवजी तीन टप्प्यांत देण्याचा घाट घातला जात आहे. शेतकऱ्यांना 60,20,20 टक्के असे एफआरपीचे तीन तुकडे होऊ देणार नाही, एफआरपी ही 14 दिवसांच्या आतच मिळावी अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेकडून तीव्र आंदोलन उभारू असा इशारा देत बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिले. यावेळी महात्मा गांधीजी यांच्या कोल्हापूर नाका येथे निदर्शने करण्यात आली.

यावेळी शेतकरी विरोधी तीन काळे कायदे रद्द करण्याची मागणीही केंद्र सरकारकडे करण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करत बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.

यावेळी विश्वास जाधव, उत्तमराव खबाले, प्रकाश पाटील, सागर कांबळे, पोपट जाधव, तात्या पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. राज्य शासनासह केंद्र सरकार विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत असतो, त्यांचा आम्ही निषेध करतो. केंद्र सरकारने चारवर्षापूर्वी शेतकऱ्यांचे उत्तन्न दुप्पटीन वाढवू सांगितले होते. तसेच दोन वर्षापूर्वी राज्य सरकारने नियमित कर्ज भरणाऱ्यांना सानुग्रह अनुदान 50 हजार रूपये देणार होते, तेही शेतकऱ्यांना मिळाले नाही. केंद्र सरकाने