गडकरी म्हणतात इथेनॉलचा वापर करा; पवारांनी सांगितला अजून पुढचा पर्याय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पेट्रोल-डीझेलच्या वाढते दर आणि प्रदुषणाच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे साखर कारखान्यात इथेनॉल निर्मितीवर भर देण्यास सांगत आहेत. गडकरींचा हा धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता गडकरींना पुढचा पर्याय सांगितलाय.

ऊसापासून साखर हे सूत्र आता कमी करावं लागेल आणि इथेनॉल निर्मिती क्षेत्रात आपल्याला जावं लागेल. याबाबत गडकरी लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे. इथेनॉल ऐवजी हायड्रोजन गॅस निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हायड्रोजन हे इथेनॉलच्या पुढची अवस्था आहे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी नॉर्वे येथील लोक मला भेटायला आले होते. इथेनॉलच्या पुढे जाऊन हायड्रोजन गॅस पुढची स्टेप त्यांनी सांगितले. हायड्रोजनच्या माध्यमातून दळणवळणाची साधने, पर्यावरणासाठी अनुकुल अशा हायड्रोजनचा वापर कसा करता येईल यासाठीच्या नव्या कल्पना त्यांनी सुचवल्या. जगातील देश आता हायड्रोजनचा अभ्यास करत आहेत. म्हणून आपल्याकडेही हे नवीन बदल आणि योजना योग्य पद्धतीने मांडणे आणि मानसिकता तयार करणे गरजेचा आहे. यासाठी गडकरींचा पुढाकार महत्वाचा आहे असे शरद पवार यांनी म्हंटल.

Leave a Comment