देशात इंधन दरवाढीचा भडका उडाला असताना ‘या’ राज्यात पेट्रोल-डिझेलसोबतच आता दारूही होणार स्वस्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गुवाहाटी । आसाममध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील भाजपा सरकारने लोकांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर ५ रूपये प्रती लिटर कमी केले आहेत. शिवाय दारूचे भाव 25 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

राज्य सरकारने गेल्या वर्षी कोरोना संकटाच्या दरम्यान पेट्रोल डिझेलवर 5 रूपये प्रती लिटर सेस टॅक्स लावला होता. जो आता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने यावर लोकांचे देखील मत सादर केले आहेत. सरकारने दारूचे दर 25 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आसाम राज्याचे वित्त मंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी दिली आहे.

यंदाच्या वर्षी एप्रिल महिन्यात आसामसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. आसाममध्ये भाजपचे सरकार आहे आणि यावेळी निवडणूक अत्यंत आव्हानात्मक मानली जात आहे. राज्यात 12 विरोधी पक्षांनी काँग्रेसच्या नेतृत्वात युतीची स्थापना केली. यामुळे तेथे भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची स्पर्धा होणार असल्याचे दिसत आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.

 

Leave a Comment