प्रधानमंत्री किसान योजनेचा पुढील हप्ता लवकरच! अजून नावनोंदणी केली नसल्यास अशा प्रकारे करा अर्ज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एप्रिल ते जुलै दरम्यान कोणत्याही वेळी पात्र शेतकर्‍यांच्या बँक खात्यामध्ये केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान योजनेचा पुढील हप्ता पाठवणार आहे. जर तुम्हीही या योजनेसाठी पात्र असाल, तुम्ही शेतकरी असाल आणि आतापर्यंत तुम्ही या योजनेसाठी रजिस्ट्रेशन केले नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे असल्यास तुम्ही या योजनेसाठी असे रजिस्ट्रेशन करू शकता.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. ऑनलाइन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता. ऑफलाईन अर्ज करायचा असल्यास, तुम्ही स्थानिक पातळीवर किंवा गाव पातळीवर ग्रामसेवक आणि स्थानीय कॉमन सर्विस सेंटरमध्ये या योजनेसाठी अर्ज करू शकता. शिवाय तुम्ही स्वतः इंटरनेटवरती या योजनेसाठी रजिस्ट्रेशन करू शकता.

पीएम किसानचा ऑफिशिअल वेबसाईटवरती जाऊन, फार्मर्स कॉर्नर वरती जा. त्या नंतर ‘न्यू फॉर्मर रजिस्ट्रेशन’वर क्लिक करा. नंतर आधार नंबर टाकावा लागेल. सोबतच कॅप्च्या टाकून राज्य निवडा आणि नंतर प्रोसेस पुढे करा. या फॉर्ममध्ये तुमची संपूर्ण वैयक्तिक माहिती भरून बँक अकाउंट आणि शेतीशी संबंधित माहिती भरा. यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like