रविवारीच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा इंधन दर वाढ; जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली इंधन दरवाढ रविवारीच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पाहायला मिळाली. आज सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली. राजधानी दिल्लीत सोमवारी पेट्रोलच्या दरात ५ पैसे वाढ झाली असून पेट्रोलचा दर प्रति लिटर ८० रुपये ८३ पैसे इतका झाला आहे. तर डिझेलच्या किंमतीत १३ पैसे वाढ झाली आहे. यामुळे दिल्लीत डिझेलचा दर प्रति लिटर ८० रुपये ५३ पैसे झाला आहे. इंधनाचे दर रोज वाढ होत असल्याने याचा थेट फटका ग्राहकांच्या खिश्याला बसत आहे.

दरम्यान, आजच्या इंधन दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलच्या किंमतीत ५ पैसे वाढ झाल्याने दर प्रतिलिटर ८७ रुपये १९ पैसे झाला आहेत. तर डिझेलच्या किंमतीत १२ पैशांची वाढ झाली असल्याने दर प्रतिलिटर ७८ रुपये ८३ पैसे झाला आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर ८२ रुपये १० पैसे झाला असून डिझेलचा दर प्रतिलिटर ७५ रुपये ६४ पैसे झाला आहे. चेन्नईत सोमवारी पेट्रोलचा दर ८३ रुपये ६३ पैसे झाला असून डिझेल प्रतिलिटर ७७ रुपये ७२ पैशांना मिळत आहे.

दिल्लीला लागून असणाऱ्या नोएडाबद्दल बोलायचं गेल्यास सोमवारी पेट्रोलचा दर प्रतिलिटर ८१ रुपये ८ पैसे झाला असून डिझेलचा दर प्रतिलिटर ७२ रुपये ५९ पैसे झाला आहे. तर गुरुग्राम येथे पेट्रोलचा दर प्रतिलिटर ७८ रुपये ६४ पैसे असून डिझेल प्रतिलिटर ७२ रुपये ७७ पैशांना मिळत आहे. गाजियाबादमध्ये सोमवारी पेट्रोल प्रतिलिटर ८० रुपये ९५ पैशांना मिळत असून डिझेल प्रतिलिटर ७२ रुपये ४४ पैशांना मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली इंधन दरवाढीमुळे ऐन कोरोना काळात महागाईचा बोजा ग्राहकांवर पडणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment