आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून साडेपाच कोटीचा निधी

सातारा | सातारा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच पाठपुरावा करणाऱ्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून शहरातील विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी 5 कोटी 46 लाख 38 हजार 58 रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर झाला आहे.

आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा नियोजन समितीने शहरातील विविध प्रभागांतील 19 कामे करण्यासाठी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेंतर्गत हा निधी मंजूर केला आहे. यामध्ये नगरसेवक शेखर मोरे पाटील यांच्या प्रभाग क्र. 5 मधील गोडोली जिजाऊ उद्यान ते साईबाबा मंदिर चौक अखेर कॉंक्रिट गटार व पाईपड्रेन करणे (रु. 25,56,870), गोडोली कामाठीपुरा बागडी जोशीवाडा येथे पाईपड्रेन करणे (रु. 9,99,990), नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांच्या प्रभाग क्र. 7 मध्ये मल्हार पेठेतील शेटे चौक ते बाटा चौक पाईपड्रेन करणे (रु. 26,93,160), राहुल भिंगारदेवे मागील बाजूस हरिभाऊ वायदंडे धट्टी अखेर रिटेनिंग वॉल बांधणे (रु. 74,75,247), रमेश सोनावणे ते राहुल शिंदे घर अखेर रिटेनिंग वॉल बांधणे (रु. 74,75,247), बाटा चौक ते मशीद व कर्मवीर हौसिंग सोसायटी येथे गटार बांधणे (रु. 60,40,230), नगरसेवक अशोक मोने यांच्या प्रभाग क्र. 14 मध्ये केसरकर पेठ मानस हॉटेल ते चारभिंती रोड आणि झोपडपट्टी अंतर्गत ठिकाणी कॉंक्रिट रस्ता करणे (रु. 12,35,462), केसरकर पेठ सागर गाडे ते प्रा. गाडे घरापर्यंत कॉंक्रिट रस्ता करणे (रु. 6,00,378).

नगरसेवक अमोल मोहिते यांच्या प्रभाग क्र. 15 मध्ये गुरुवार पेठेत कांबळे घर ते न. पा. पाण्याची टाकी आणि संतोषी माता पायऱ्या येथे कॉंक्रिट रस्ता करणे (रु. 17,58,338), नगरसेवक रवी ढोणे यांच्या प्रभाग क्र. 19 मधील मंगळवार पेठ विकी वायदंडे ते वेताळबाबा मठ अखेर रिटेनिंग वॉल बांधणे (रु. 27,18,360), ढोणे कॉलनी अंतर्गत ठिकाणी गटार व पाईपड्रेन करणे (रु. 9,67,510), सकटे घर मागील बाजूस सार्वजनिक शौचालय अखेर कॅनॉल टाईप गटार करणे (रु. 35,45,472), पॉवर हाऊस शंकर चव्हाण घर ते मारुती थोरात घर अखेर संरक्षक भिंत बांधणे (रु. 22,16,008), बागणीकर घर ते बोगदा रस्ता लगत संरक्षक भिंत बांधणे (रु. 40,00,000), रामाचा गोट, ढोणे कॉलनी अंतर्गत ठिकाणी गटार व पाईपड्रेन करणे (रु. 10,00,000),

नगरसेविका लीना गोरे यांच्या प्रभाग क्र. 20 मधील मंगळवार पेठेतील योगेश तारळेकर घर ते समाजमंदिर रिटेनिंग वॉल बांधणे (रु. 27,72,950), कदम घर ते कोकरे घर अखेर ओढ्यास संरक्षक भिंत बांधणे (रु. 37,88,194), खारी विहीर, होलार गल्ली ते महाराष्ट्र मंडळ अखेर रस्ता डांबरीकरण करणे (रु. 19,94,642), होलार वस्ती, शरद शेलार घर ते दादा आवटे घर रस्ता डांबरीकरण करणे (रु. 8,00,000) या कामांचा समावेश आहे. निविदा प्रक्रिया तातडीने राबवून कामे वेळेत पूर्ण करा आणि कामे दर्जेदार करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.