कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील विकास कामासाठी निधी मंजूर केला जात आहे. राज्याचे माजी सहकार मंत्री तथा कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने कराड उत्तर विधानसभा मतदार संघासाठी अर्थसंकल्पातून 27.45 कोटी निधी मंजूर झाला आहे.
अर्थसंकल्पात मंजूर करण्यात आलेल्या कामांमध्ये खंडाळा – कोरेगांव – कराड – सांगली – शिरोळ रस्ता रा.मा .१४२ कि.मी.९ १ / २०० ते ९ ४ / ०० ( भाग – मसूर ते शहापूर फाटा ) रस्त्याचे चौपदरीकरणासह सुधारणेसाठी ५ कोटी, मल्हारपेठ – मसूर – मायणी – पंढरपूर रस्ता रा.मा .१४३ कि.मी .२१ / ००० ते २४/४०० ( भाग – मसूर पोलीस चौकी ते रिसवड ) मधील लांबीची रूंदीकरणासह सुधारणेसाठी ३ कोटी ५० लाख, मल्हारपेठ – मसूर – मायणी – पंढरपूर रस्ता रा.मा. १४३ कि.मी .१८ / ३०० ते २१/००० ( भाग – कोरेगांव फाटा ते मसूर पोलीस चौकी ) मधील लांबीच्या रस्ता व बंदिस्त आरसीसी गटर बांधकामासाठी ३ कोटी ५० लाख, खंडाळा – कोरेगांव – कराड – सांगली – शिरोळ रस्ता रा.मा .१४२ अ कि.मी .१ / ८०० ते ३ / ९ ०० ( भाग – विरवडे फाटा ते ओगलेवाडी ) च्या सुधारणेसाठी २ कोटी. वडोली निळेश्वर – पार्ले – बनवडी- सैदापूर रस्ता प्रजिमा -६ ९ कि.मी .३ / ८०० ते ४/२०० ( भाग – पार्ले ते बनवडी ) मधील रस्त्याचे मजबुतीकरणासह सुधारणेसाठी ६ कोटी. पारगांव ते कुर्ले रस्ता ग्रा.मा. २५८ कि.मी. ० / ०० ते ४/५०० रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ३० लाख, गोरेगांव (वांगी) ते हिंगणगांव ग्रा. मा. २७६ रस्ता सुधारणा करण्यासाठी ४० लाख रुपये मजूर करण्यात आले आहेत.
तसेच वडोली निळेश्वर – पार्ले – बनवडी – सैदापूर रस्ता प्रजिमा ६९ कि.मी .४ / ५०० ( भाग – पार्ले ते बनवडी स्टॉप ) मधील लहान पुलाच्या रस्त्यास संरक्षक भिंत बांधणेसाठी १ कोटी, मल्हारपेठ – मसूर – मायणी – पंढरपूर रस्ता रा.मा .१४३ कि.मी .१२ / ७०० ते १८/३०० ( भाग – शिवडे फाटा ते कोरेगांव फाटा ) मधीलसुधारणेसाठी ५ कोटी, मल्हारपेठ – उंब्रज – मसूर – मायणी – दिघंची – पंढरपूर रस्ता रा.मा .१४३ कि.मी .० / ०० ते ६०/०० ( भाग – मल्हारपेठ – उंब्रज – मसूर – मायणी ते सातारा जिल्हा हद्द ) सुधारना यासह पाटण, कराड, खटाव, माण व सातारा तालुका या प्रकल्पाचे सविस्तर प्रकल्प तयार करणे व अंतिम करण्या करिता सल्लागार सेवा पुरविण्यासाठी ७५ लाख अशा एकूण 27.45 कोटी रुपये निधी अर्थसंकल्पातून मंजूर झाले आहेत.