हवा भरताना JCB चा टायर फुटला, दोघांचा मृत्यू; CCTV व्हिडिओ पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्तीसगडच्या रायपूरमधील सिलतारा येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हवा भरताना जेसीबीचा टायर फुटला. या अपघातात तेथे उपस्थित असलेल्या दोन कामगांराचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

या व्हिडीओ मध्ये आपण पाहू शकता की, २ व्यक्ती जेसीबीच्या भल्या मोठया टायरची हवा भरत होते. त्यातील एक जण हवा भरण्यासाठी टायर वर बसला होता तर दुसरा व्यक्ती टायरच्या बाजूला हात लावून बघत होता. त्याच दरम्यान अचानक टायर फुटला आणि हे दोघेही अक्षरशः हवेत उडून पडले. टायरचा दणका एवढा मोठा होता की या घटनेत दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

फॅक्ट्रीमधील सीसीटीव्ही फूटेजमध्ये ही दुर्दैवी घटना समोर आली. राजपाल सिंह आणि प्रांजन नामदेव अशी मृतांची नावे असून दोघेही उत्तरप्रदेश येथील आहेत. दोघांच्या या अकाली मृत्युने फॅक्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे