फ्यूचर ग्रुप केसः NCLT म्हणाले-“Amazon ने नेहमी गडबड करू नये”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । ई-कॉमर्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी अ‍ॅमेझॉनला (Amazon) नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (National Company Law Tribunal) यांनी शुक्रवारी सांगितले की,”त्यांच्याकडे फ्यूचर ग्रुपमध्ये (Future Group) कोणतीही ‘लोकस स्टॅंडी’ (Locus Standi) नाही आहे कि ज्यामुळे ते शेयरहोल्डरर्सची मिटिंग बोलावू शकतील.” एनसीएलटीने म्हटले आहे की,”Amazon नेहमी गडबड करू नये.”

शेयरहोल्डरर्सच्या मिटिंगसाठी फ्यूचर ग्रुपच्या याचिकेवर NCLT सुनावणी करीत आहे. दरम्यान, Amazon ने एनसीएलटीच्या कार्यवाहीत इंटरलोक्यूटरी अर्ज दाखल करण्याची मागणी केली आहे. आता NCLT आज संध्याकाळी पुन्हा सुनावणीला सुरुवात करेल.

फ्यूचर-रिलायन्स डीलसाठी Amazon SC कडे वळला
यापूर्वी रिलायन्सबरोबर फ्यूचर ग्रुपचा 24,713 कोटी रुपयांची डिल रोखण्यासाठी अ‍ॅमेझॉनने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अलीकडेच दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

फ्यूचर रिटेल लिमिटेड आणि रिलायन्स रिटेल यांच्यात 24,713 कोटी रुपयांच्या व्यवसाय संपादन कराराच्या संदर्भात एकल न्यायाधीशांच्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. एकल न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या आदेशात फ्यूचर रिटेल लिमिटेड आणि विविध वैधानिक संस्थांना यथास्थिती कायम ठेवण्यास सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.