नियमांत शिथिलता आणून राज्यात चित्रिकरण होणार सुरू..?; FWICEचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विनंतीपत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गतवर्षापासून राज्यभरात कोरोनाच्या महामारीने थैमान घातले असता अनेक क्षेत्रांना लॉकडाउनचा समोर करावा लागत आहे. परिणामी याचा फटका अर्थव्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. लॉकडाऊनमूळे सिनेसृष्टीलाही मोठं नुकसान सहन कराव लागत आहे. राज्यात गेल्यावर्षीपासून अनेक चित्रपटांचे चित्रिकरण आणि प्रदर्शन रखडले आहे. सोबतच संबंधित संपूर्ण कामकाज ही ठप्प झाले आहे. मागच्या वर्षीचा अनुभव घेता अनेक मालिका निर्मात्यांनी महाराष्ट्रातील लॉकडाउनचा अंदाज घेऊन राज्याबाहेर शुटींग करण्याचा धाडसी निर्णय घेतला. यामुळे आर्थिक दृष्ट्या निर्मात्यांनीही हात टेकले. मिळालेल्या माहितीनुसार FWICE (Federation of Western India Cine Employees) कडून राज्यात नियम शिथिल करून पुन्हा चित्रकरण सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी असे विनंतीपत्र महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.

इतकेच नव्हे तर, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत याविषयावर एक महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याचेही समजत आहे. शनिवारी राज्यसरकारने अशी घोषणा केली की, मुंबई आणि ठाणे याठिकाणी बायो बबलच्या माध्यमातून शुटींग केले जाऊ शकते. मात्र यासाठी अट असेल. हि अट अशी कि, केवळ ८ तासच शुटींग केली जाऊ शकते. FWICE चे अध्यक्ष बी एन तिवारी याविषयी बोलताना म्हणाले की, “इतरवेळी आम्ही १२ तास काम करतो पण याविषयी आम्ही राज्यशासनाशी चर्चा करत आहोत. मुंबई आणि ठाण्यात शुटींगला परवानगी मिळाली आहे. काही निर्माते हे राज्याबाहेर शुटींग करत आहेत. तेथील काम संपवून ते लवकरच आपल्या राज्यात परततील.”

https://twitter.com/ashokepandit/status/1399932740699443202

 

पुढे म्हणाले की, ‘पाऊस आणि तौक्ते वादळामुळे अनेक मोठं मोठ्या सेट्सचं नुकसान झालं आहे. त्यांच्या नियोजनाचे तूर्तास काम सुरू आहे. ज्या ठीक शूटिंगसाठी परवाना मिळाला आहे, तेथे संध्याकाळी ५ वाजेपर्यंत शुटींग संपवावे लागणार आहे. तसेच बायो बबलचे पालन करून शुटींग करणे अनिवार्य राहील. फिल्म आणि टेलिव्हिझन उद्योगाने एक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत सेटवरील सगळ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणे बंधनकारक असेल.” त्यामुळे आता लवकरच पुन्हा एकदा मुंबईत शुटींग सुरु होणार आहे.

Leave a Comment