Saturday, June 3, 2023

महाराष्ट्र मॉडेलचं अन्य राज्यांनी अनुकरण करावं; उद्योजकांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते. परंतु सध्या परिस्थिती काही प्रमाणात आटोक्यात आली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा उद्योगधंदे बंद करावे लागले. त्यामुळे देशाला मोठा आर्थिक तोटा झाल्याचं समोर आलं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी उद्योगपतींशी चर्चा केली. या चर्चेनंतर उद्योगपतींनी मुख्यमंत्र्यांचे कौतुक केले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं उद्योजकांनी कौतुक केलं असून काही सूचना देखील दिल्या आहेत. उद्योजक हर्ष गोएंका यांनी ट्विट करुन मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्राचं हे मॉडेल इतर राज्यांनीही अनुकरण करायला हवं, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वीच उद्योजक आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्र्यांचं ट्विटरवरुन कौतुक केलं होतं. मुख्यमंत्र्यांनी जून महिन्यात वाढविलेल्या लॉकडाऊनचं महिंद्रा यांनी समर्थन केलं होतं.

आपण कॅलक्युलेटेड रिस्क घेत आहोत अनलॉक करताना त्यामुळे काळजी घ्या. एकदम काहीही शिथिल केलेले नाही. उद्योगांनी त्यांच्या भागात कामगार व कर्मचारी यांच्यासाठी तात्पुरत्या निवास सुविधा उभाराव्यात, तसेच वैद्यकीय व इतर आवश्यक सुविधा यांचे नियोजन करून ठेवावे, अशा सुचना देखील त्यांनी दिल्या आहेत.

बांधकाम कामगार तसेच राज्यातील इतर उद्योगांमध्ये बाहेरील राज्यातील जे कामगार काम करीत आहेत त्यांची आरोग्य विषयक नोंद व्यवस्थित ठेवा. त्यांनी त्यांच्या राज्यात जाताना आणि तिकडून येताना कोविडचा विषाणू पसरवू नये . त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची देखील माहिती ठेवा. कामगार परराज्यातून आल्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवावे, त्यांची तपासणी करावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.