हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर आज काँग्रेस संसदीय रणनीती गटाची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेऊन पक्षाच्या हितासाठीच्या उपाययोजनांबाबत चर्चा केली, त्याचप्रमाणे काँग्रेसच्या नूतन अध्यक्षाची निवडणूक नियोजित वेळेपूर्वी घेण्याबाबत मंथन झाले. एएनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी पक्षाच्या ‘G23’ गटाच्या नेत्यांनी मुकुल वासनिक यांना काँग्रेसच्या नवीन अध्यक्षपदासाठी पुढील काँग्रेस अध्यक्ष म्हणून सुचवले. मात्र, ही सूचना काँग्रेस कार्यकारिणीने मान्य केली नाही.
सूत्रांनी सांगितले की, “G23, ज्यामध्ये आनंद शर्मा, गुलाम नबी आझाद, कपिल सिब्बल यांचा समावेश आहे, त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदासाठी मुकुल वासनिक यांचे नाव सुचवले होते, परंतु ते मान्य करण्यात आले नाही. G23 चा भाग असलेल्या एका नेत्याने असेही म्हटले आहे की पक्षाच्या नवीन अध्यक्षाने 2000 च्या दशकाच्या सुरुवातीस सोनिया गांधींनी ज्या पद्धतीने पक्षाचे नेतृत्व केले होते त्याच पद्धतीने पक्षाचे नेतृत्व केले पाहिजे.
G23 suggested Mukul Wasnik for Congress chief post: Source
Read @ANI Story | https://t.co/mmvx6tG8v9#Congress #G23 #MukulWasnik #AssemblyElections2022 pic.twitter.com/zsWCkDwemb
— ANI Digital (@ani_digital) March 13, 2022
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरच्या निवडणुकीत काँग्रेसला यूपी वगळता 4 राज्यांमध्ये चांगली कामगिरी अपेक्षित होती. पण असे झाले नाही. पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी कुठेही जागा जिंकता आल्या नाहीत. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या नाराज नेत्यांचा गट G-23 सक्रिय झाला. याच पार्श्वभूमीवर गुलाम नबी आझाद यांच्या घरी या नेत्यांची बैठक झाली. यामध्ये पक्षाध्यक्षपदाची निवडणूक तत्काळ घेणे आणि अन्य संघटनात्मक सुधारणा करण्याच्या उपाययोजना करण्यावर चर्चा झाली. या शिबिराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाने पराभवाचा आढावा घेण्यासाठी कार्यकारिणीची बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला.