गडचिरोलीत राष्ट्रवादीच्या आमदाराच्या सुरक्षारक्षकाची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

गडचिरोली : हॅलो महाराष्ट्र – गडचिरोलीमध्ये राष्ट्रवादीच्या आमदाराच्या सुरक्षारक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अहेरी मतदारसंघाचे आमदार आणि माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या एका पोलीस शिपायाने स्वतःच्या बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. प्रमोद शोकोकर असे मृत सुरक्षारक्षकाचे नाव होते. मृत प्रमोद शोकोकर हे अहेरी उपविभागीय अंतर्गत ताडगाव पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते. ते मूळ बुलडाणा येथील रहिवासी होते. ते ताडगाव पोलीस स्टेशन येथून काही दिवसांपूर्वीच आमदार धर्मराव आत्राम आमदार यांच्याकडे सुरक्षा गार्ड म्हणून रुजू झाला होता. कुटुंबातील तणावामुळे त्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिकदृष्ट्या समजत आहे.

काय आहे प्रकरण?
गडचिरोलीतील अहेरी मतदारसंघाचे आमदार आणि माजी राज्यमंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या सुरक्षेत तैनात पोलीस शिपायाने स्वतःच्या बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. मृत सुरक्षारक्षक प्रमोद शोकोकर हे अहेरी उपविभागीय अंतर्गत ताडगाव पोलीस स्टेशनमध्ये पोलीस जवान म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वीच ते आमदार धर्मराव आत्राम यांच्याकडे सुरक्षा गार्ड म्हणून रुजू झाले होते. मृत प्रमोद शोकोकर यांनी कौटुंबिक ताण तणावातून टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती सापडली आहे.

धर्मराव बाबा आत्राम कोण आहेत?
गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मराव बाबा आत्राम चार वेळा निवडून आले आहेत. आघाडी सरकारमध्ये ते मंत्रीसुद्धा होते. अहेरी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जायचा. मात्र या मतदारसंघात खिंडार पडल्यानंतर धर्मराव बाबांचा एकदा अपक्ष दीपक आत्राम आणि दुसऱ्यांदा पुतणे आणि भाजप उमेदवार अंबरीश आत्राम यांनी पराभव केला होता. मात्र 2019 मध्ये धर्मराव बाबांनी जोरदार कमबॅक करत पुन्हा निवडणूक जिंकली.