गडचिरोली प्रतिनिधी । पंतप्रधानांनी मागील वर्षापासून संपुर्ण भारतात शेतकर्यासाठी शेतकरी सन्मान योजना सुरु केली.या अंतर्गत थेट शेतकर्यांच्या बँक खात्यात सरळ तीन टप्प्यात प्रत्येकी २ हजार प्रमाणे १२ महिन्यात सहा हजार रुपये जमा करण्याची महत्वकांक्षी योजना आणली. मात्र, अधिकारी वर्गाच्या उदासिन भुमिकेमुळे शेतकर्यामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. धानोरा तालुक्यातील शेकडो शेतकरी या योजनेपासून वंचीत असल्याने आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. झालेल्या नुकसानीस जबाबदार कोण असा प्रश्न शेतकरी विचारीत आहेत. तालुक्यातील शेकडो शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेपासुन वंचित आहेत
नक्षलग्रस्त म्हणून ओळख असलेल्या धानोरा तालुक्यातील बहूसंख्य शेतकरी अडाणी, निरक्षर आहेत. शेतकर्यांनी जवळपास तीनदा ऑनलाईन अर्ज केले. मात्र त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत.सरकारने योजना सुरु करण्यापुर्वी शेतकर्यांना ऑनलाईन फार्म भरायला लावले.त्यानंतर तलाठी, कृषी सेवक ग्रामसेवक यांनी शेतकर्यांच्या याद्या तयार केल्या.त्यानंतर याद्या तहसिलदार यांच्या कार्यालयात जमा करण्यात आल्या. ही योजना शेतकर्यांना अतिशय लाभदायक आहे. मात्र धानोरा तालुक्यातील सरसरी ४५०० शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत.
काही शेतकर्यांच्या बँक खात्यात मागील वर्षाचे व चालू हंगामातील पैसे जमा झाले. मात्र अनेक शेतकर्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. पैसे का जमा झाले नाहीत याबाबत शेतकऱ्यांनी चौकशी केली असता त्यांना टोलवा टोलवीचे ऊत्तरे मिळाली. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेपासून वंचित शेतकर्यांची प्रशासकीय अधिकार्यांनी दखल घेऊन योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी केली जात आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.