Monday, January 30, 2023

कराड येथील नामांकित रेस्टारंटमध्ये खाद्यपदार्थात झुरळ?

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड शहरातील दत्त चौकात असणार्‍या एका नामंकित रेस्टारंटमध्ये एका ग्राहकांस खाद्यपदार्थात झुरळ सापडल्याचा प्रकार घडला. या रेस्टारंटमध्ये ग्राहकांने अन्न औषधच्या अधिकार्‍यांना त्यासंबधी माहीती दिली, मात्र काही वेळात ग्राहकांने रेस्टारंट चालक नातेवाईक असल्याचे सांगत पळ काढला. तर अन्न औषध विभागाच्या अधिकार्‍यांने रेस्टारंटची तपासणी हा कामाचा भाग असल्याचे सांगत तपासणी केली असल्याचे सांगितले.

- Advertisement -

कराड येथील दत्त चौकात छ. शिवाजी महाराज स्मारकाजवळ नामंकित जुने रेस्टारंट आहे. दुपारी तीनच्या सुमारास कोल्हापूर येथील एक ग्राहक खाद्यपदार्थ खाण्यासाठी गेले होते. तेव्हा त्या खाद्यपदार्थात झुरळ असल्याचे आढळून आले. त्यावेळी ग्राहकांने रेस्टारंटमध्ये मोठा गोंधळ घातल्याने तेथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. रेस्टारंटमधील प्रकार घडल्यानंतर काही वेळातच अन्न औषधचे अधिकारी दाखल झाले.

शहरातील नामाकिंत रेस्टारंटमध्ये हा प्रकार झाल्याने अनेकांनी दत्त चौकात प्रकार पाहण्यासाठी गर्दी केली होती. काही वेळाने खाद्यपदार्थात झुरळ सापडल्याचे सांगितले, त्यांनी रेस्टारंट चालक नातेवाईक असल्याचे म्हणत घटनास्थळावरून काढता पाय घेतला.

या रेस्टारंटमध्ये अन्न आणि औषध विभागाच्या अधिकार्‍यांनी जवळपास दोन तास तळ ठोकला होता. सदरील नेमका प्रकार काय यांची उत्सुकता नागरिकांच्यात होती. अन्न आणि औषध विभागाच्या अधिकार्‍यांना रेस्टारंटमधील प्रकाराबाबत विचारले असता, आमचा कामाचाच भाग असल्याचे सांगितले. या रेस्टारंटची पहिल्यांदाच तपासणी करत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. मात्र यावेळी पत्रकारांनी अधिकार्‍यांना काही प्रश्‍न विचारले असता त्यांची उत्तर न देता आपल्या चारचाकी गाडीतून पलायन केले. पत्रकारांना टाळत अधिकार्‍यांने पलायन केल्याने नक्की काय प्रकार आहे असा प्रश्‍न उपस्थित नागरिकांच्यातून केला जात आहे.

“दत्त चौकातील नामांकित रेस्टारंटची आमच्याकडे कोणत्याही प्रकारची कोणीही तक्रार केली नाही. रेस्टारंटची तपासणी करणे हा आमच्या कामांचा भाग आहे. त्यामुळे मी तपासणी केली आहे, बाकीचे मला काही माहिती नाही.”
– श्री. शहा
अन्न आणि औषध विभाग अधिकारी, सातारा