नवी दिल्ली । लडाखमधील गलवान खोऱ्यात चिनी सैन्याच्या हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाल्यानंतर भारत-चीन यांच्यातील संबंधात तणाव निर्माण झाला आहे. या मुद्द्यावर विरोधकांकडून सातत्यानं विचारणा होत असल्यानं केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत चिनी सैन्यानं भारतीय भूभागात घुसखोरी केलीचं नसल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता.पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या दाव्यानंतर बराच वाद निर्माण झाला आहे. विरोधकांकडून मोदी सरकारवर टीका केली जात आहे. जेएनयूतील माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमारनंही याच मुद्यावरून सरकारला लक्ष्य केलं आहे.
पंतप्रधानांनी केलेल्या दाव्यानंतर जेएनयूतील विद्यार्थी नेता कन्हैया कुमारनं सरकारवर ट्विटरवर टीकेची तोफ डागली आहे. कन्हैया म्हणाला कि, “घरात घुसून मारू असं म्हणत सत्तेत आलेली व्यक्ती आपले २० जवान शहीद झाल्यानंतर म्हणतेय की घरात कुणी घुसलंच नाही,” असं ट्विट करत कन्हैयानं पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे.
“घर में घुसकर मारूंगा” कहकर सत्ता में आने वाला हमारे 20 जवानों की शहादत के बाद कह रहा है कि “घर में कोई घुसा ही नहीं”
ये फेंकू ही नहीं, फट्टू भी है।
— Kanhaiya Kumar (@kanhaiyakumar) June 20, 2020
दरम्यान, चीननं घुसखोरी केलीच नसल्याच्या मोदींच्या विधानावर पंतप्रधान कार्यालयानं आज स्पष्टीकरण दिलं आहे.”पंतप्रधानांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. पराक्रमी जवान देशाच्या सीमांचा रक्षण करत असताना त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी अनावश्यक वाद उभा केला जात आहे, है दुर्दैवी आहे. पंतप्रधानांनी केलेल्या विधानांवर उपस्थित करण्यात आलेले प्रश्न हा प्रोपोगंडा असून, यामुळे भारतीयांची एकत्मता कमी होणार नाही,” असं पीएमओ कार्यालयानं स्पष्ट केलं आहे.
“सर्व पक्षीय बैठकी पंतप्रधानांनी हे स्पष्ट केलं होतं की, पंतप्रधानांनी केलेलं विधान १५ जून रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाशी संबंधित होतं. ज्यात २० जवान शहीद झाले होते. प्रत्यक्ष सीमा रेषेजवळ चिनी सैन्य पूर्वीपेक्षा अधिक संख्येनं आलं होतं. १५ जून रोजी चिनी सैन्याकडून प्रत्यक्ष सीमा रेषेजवळ भारतीय हद्दीत बांधकाम करण्याचा प्रयत्न झाला. हे काम रोखण्यास चिनी सैन्यानं नकार दिला होता. मात्र, १६ बिहार रेजिमेंटच्या जवानांनी पराक्रम दाखवत हा प्रयत्न हाणून पाडला. त्यामुळे संघर्ष उफाळून आला. जवानांच्या पराक्रमामुळे सीमेजवळ चिनी सैन्य नाही.” असं पंतप्रधान कार्यालयानं स्पष्ट केलं आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”