हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्णधार रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय क्रिकेट संघाने सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) खांद्यावर टीम इंडियाची धुरा दिली. खरं तर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) उपकर्णधार असल्याने तोच टीम इंडियाचा पुढचा कर्णधार होईल असं बोलले जात होते, मात्र ऐनवेळी हार्दिक ऐवजी सूर्यकुमार यादवला भारताच्या टी-२० संघाचे कॅप्टन करण्यात आलं त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. मात्र आता प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी सूर्याला कर्णधार करण्यामागचं कारण सांगितलं आहे.
श्रीलंका दौरा सुरू होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी दोघांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं. यावेळी अजित आगरकर म्हणाले, सूर्यकुमार यादवला कर्णधार बनवण्यात आले कारण तो योग्य उमेदवारांपैकी एक आहे. आपल्याला सर्व सामने खेळणारा कर्णधार हवा आहे. हार्दिक पंड्या हा आपल्यासाठी महत्वाचं खेळाडू आहे परंतु त्याचा फिटनेस त्याच्यासाठी चिंतेचा विषय आहे. त्यामुळे त्याला प्रत्येक सामन्यात खेळवणे निवड समितीसाठी अवघड बनतं. आम्हाला असा कर्णधार हवा होता जो सर्व सामने खेळण्यासाठी उपलब्ध असेल. सूर्यामध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण आहेत असे स्पष्टीकरण अजित आगरकर यांनी दिले.
शुभमन गिलला उपकर्णधार का केल? याचेही कारण अजित आगरकर यांनी दिले. शुभमन गिल तिन्ही फॉरमॅटचा खेळाडू आहे, असे आम्हाला वाटते. गेल्या वर्षभरात त्याने त्याच्यातील गुणवत्ता दाखवली आहे. त्याने कर्णधारपदाचे काही चांगले गुण दाखवले आहेत. आम्ही त्याला जास्तीत जास्त अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहोत असं अजित आगरकर यांनी सांगितले.
दरम्यान, ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मा याना फॉर्मात असूनही बाहेर का बसवलं? असा प्रश्न केला असता अजित आगरकर म्हणाले, ‘संघातून वगळलेल्या कोणत्याही खेळाडूला खूप वाईट वाटेल. रिंकूकडेच बघा, टी-20 वर्ल्ड कपपूर्वी त्याने चांगली कामगिरी केली होती, पण तरीही त्याला संघात स्थान मिळालं नव्हते. आम्ही फक्त 15 खेळाडू निवडू शकतो