कोरोनाने जगाला पुन्हा एकदा गांधीजींच्या मार्गावर आणलंय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

थर्ड अँगल | Covid-१९ हा उत्तराधुनिक जगाला जागं करणारा इशारा आहे. एक पारंपरिक म्हण आहे, “प्रत्येक समस्या ही एका संधीच्या रूपात असते”, सध्याच्या साथीच्या काळातील नाट्यमय स्थितीत महात्मा गांधींनी सांगितलेल्या आधुनिकतेच्या मोहाला आपल्यापासून दूर ठेवण्याच्या (१९०९ मध्ये हिंद स्वराज जाहीरनाम्यात) गोष्टीवर प्रकाश पडतो.

कोरोनामुळे आता भारतीयांसोबत जगभरातील लोक स्वदेशी, स्वछता आणि सर्वोदय या गांधीजींच्या तत्वांचा विचार करायला लागले आहेत.

गीता धर्मपाल

गांधीजींनी आधुनिक संस्कृती हा आजार असून, आपण याला बळी पडता कामा नये असे सांगितले. या विधानाला आपण भविष्यातील सूचनांचे पूर्वज्ञान म्हणून शकतो की नाही. त्याकाळी गांधीजींनी हे निंदात्मकरित्या व्यक्त केले आहे. त्यांनी टीकात्मक पद्धतीने हे विवादात्मक विधान केले. ज्यात त्यांना असे सांगायचे होते की, कायदेशीर वसाहतीचा उपक्रम खालच्या पातळीचा आहे. त्यांनी रेल्वे, (ही साथीच्या रोगाची वाहक आहे अशी लक्षवेधक टीका केली.), न्यायालये, आधुनिक औषधे आणि इंग्रजी शिक्षण यावर कडक टीका केली. अशा विचित्र गोष्टींमुळे विषाणू वाढत, पसरत आहे आणि मृत्यूच्या संख्येतही वाढ होते आहे. आधुनिकतेची तकाकी हळूहळू निघून जाऊन आपल्याला आता एक फसवे मृगजळ दिसते आहे. हे जे जागतिक राहणीमान आहे ते आपल्याला कमकुवत बनवत आहे याची जाणीव इथे आहे. (गांधीजींच्या दृष्टीने मानसिक आणि शारिरीक दोन्ही बाजूने). मोफत उद्योग, कमी किमतीच्या फ्लाईट्स आणि सोशल मीडिया यांनी आपल्याला जवळ आणले खरे, पण त्यामुळे आपण आणखी असुरक्षित झालो आहोत. अफवा आणि खोट्या बातम्या या विषाणूपेक्षाही जास्त वेगाने पसरत आहेत. त्यामुळे लोकांमधील वेड्याचा बाजार वाढला आहे. यामध्ये प्राथमिक पातळीवर बळी पडलेल्या लोकांमध्ये भारत आणि दक्षिणेतल्या लोकांचा समावेश आहे, जे या असमांतर समाजात खूप सुखसोयींयुक्त आयुष्य जगले आहेत. ज्यांनी स्वतःला नेहमीच निसर्गापेक्षा मोठे मानले आहे आणि ज्यांचा निसर्गापेक्षा विज्ञानावर जास्त विश्वास आहे. 

माध्यमांमध्ये ज्या गोष्टी ओरडून सांगितल्या जात आहेत की, आपण अनर्थाच्या १-२ पावले मागे आहोत, हे केवळ आधुनिकतेची जी अतिमहत्वकांक्षा आहे ती एका गुन्हेगारी अन्यायाचा देखील प्रकार आहे. या घातक विषाणूमुळे समाजातील असुरक्षित असणाऱ्या लाखो लोकांच्या वेदना समोर आल्या आहेत. सामाजिक आणि आर्थिक असमानतेवर प्रकाशझोत पडला आहे. चालू परिस्थितीला सामोरे जात असताना आपण एक गोष्ट आठवूया, जिथे गांधीजींनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना लिहिलेल्या एका पत्रात (५ ऑक्टोबर १९४५) एकेकाळी रूपकात्मक पूर्वग्रह व्यक्त केले होते. त्यांनी लिहिले होते, “जेव्हा पतंग मरणाजवळ जातो, तेव्हा स्वतःभोवती अतिवेगाने गोल फिरत राहतो. भारत या पतंगासारख्या गोल फिरण्यातुन सुटका करू शकणार नाही याची शक्यता आहे. भारताला वाचविण्यासाठी पर्यायाने जगाला या प्राक्तनातून मोकळे करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणे हे माझे कर्तव्य आहे.”  गांधीजींची ही काहीतरी आपत्ती येत असल्याची गोष्ट आता आपल्याला समजली पाहिजे आणि एक नवी मानसिकता तयार झाली पाहिजे.

त्यांच्या प्रोत्साहनात्मक उदाहरणानुसार, आपण आता पर्यायी व्यवहार्य सुसंघटित राज्यसंस्थेचे एक मॉडेल केले पाहिजे. जे आपल्याला या समकालीन पेचप्रसंगातून सोडवेल. अर्थकारण, राजकारण, तंत्रज्ञान जर दारिद्र्यरेषेखालील लोकांच्या चांगल्याचे डोक्यात ठेवून तत्वांसोबत एकत्र केले तर ते आपल्याला या वाईट परिस्थितीत एक आधार म्हणून मदत करेल. लवकरात लवकर या विषाणूला कमी करण्यासाठी अलोपॅथी औषधे उपयोगाची नाहीत. प्रभावी प्रतिबंधक उपचारासाठी आपण गांधीजींनी सांगितलेल्या निसर्गोपचार प्रक्रियेचे अदम्य प्रयोग करणे, उत्तम स्व-स्वच्छतेचा सराव करणे, सामाजिक निर्जंतुकीकरणासाठी प्रचार आणि खात्री करणे, आपल्या परिसरातच राहणे, दूरचा प्रवास टाळणे आणि सार्वजनिक ठिकाणची उपस्थिती टाळणे या गोष्टींवर काम केले पाहिजे. थोडक्यात गांधीजींची स्वदेशी, स्वच्छता आणि सर्वोदय ही मूल्ये आपली मार्गदर्शक असायला हवीत. 

थोडक्यात जागतिक राहणीमानाच्या आहारी जाण्यापेक्षा आपण गांधीजींच्या – आपल्या गावाच्या हद्दीतच सर्व अनुभव घ्यायला शिकणे, आपल्या निसर्गात शांततेने राहणे त्याचे शक्य तितके शोषण कमी करणे, या “स्थानिकीकरणाचा” (उपनिषद वचनांमध्ये सांगितल्याप्रमाणे विश्वम पृष्ठम ग्रामे अस्मीन अनथुरम) मार्ग स्वीकारला पाहिजे. शेवटी जागतिक अर्थव्यवस्थेचा जो विध्वंस होतो आहे त्यामध्ये आपल्या ग्रामीण अर्थकारणाला पुन्हा नव्याने उभे करण्याच्या गांधीजींच्या ग्रामस्वराज्यच्या स्वप्नाची पूर्ती करण्याचा हा एक आदर्श क्षण आहे. या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी “साधी राहणी, उच्च विचारसरणी” च्या माध्यमातून “तुम्ही ते परिवर्तन व्हा जे तुम्हांला या जगात हवे आहे.” हाच संदेश जणू आपल्याला निसर्ग देत आहे. आपण प्रत्येकजण मानवता दाखवून पृथ्वीला चांगले काहीतरी परत देण्यासाठी सहकार्य करू शकतो. ज्यायोगे महात्मा गांधींनाही आपण अभिवादन करू शकू.
 
लेखिका या गांधी रिसर्च फौंडेशन, जळगावच्या प्राध्यापिका आणि प्रमुख आहेत. या लेखाचा अनुवाद जयश्री देसाई यांनी केला आहे.