कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही कोरोनाचे संकट आपल्यावर आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार काही निर्बंध शिथील करण्यात आलेल्या आहेत. दहा दिवसांचा गणेशोत्सव शांततेने आणि कायद्याच्या नियमांचे पालन करून हा सण साजरा करावा. मी सर्व राज्यातील तसेच सातारा जिल्ह्यावासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत आहे. तसेच कोरोना नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन सहकारमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कराड येथील निवासस्थानी गणेशमूर्ती विराजमान केलेली आहे. पालकमंत्री स्वतः कराड येथील कुंभार वाड्यात घरचा गणपती आणण्यासाठी गेलेले होते. कुंभारवाड्यात गणपती घरी नेण्यासाठी लोकांची लगबग सुरू होती. यावेळी पालकमंत्री यांच्या घरातील सदस्य उपस्थित होते. कराड नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते साैरभ पाटील, सागर पाटील, जशराज पाटील उपस्थित होते.
पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले, गणेश उत्सव हा साजरा करताना सुरक्षित अंतर ठेवावे. राज्यात या सणामुळे लोकांच्यात उत्साहाचे वातावरण आहे. या लोक उत्सवामुळे अनेक लोक एकत्र येतात मात्र आपल्या लोकांची काळजी घेण्यासाठी कोरोना नियम पाळून सण साजरा करण्यात यावा.