नाशिक हादरलं !! 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

Crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नाशिक येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका १३ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतले आहे. मुलीला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पीडितेच्या आईने या घटनेनंतर तक्रार दिली आहे. पोलिसांनी सात संशयित आरोपींना अटक केली आहे.

नाशिकरोड परिसरातील अरिंगळे मळ्यात 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनुसार, नाशिकरोड पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

या सात जणांनी चाकुचा धाक दाखवून पीडितेवर अत्याचार केल्याची नोंद तक्रारीत करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे 7 आरोपींमध्ये 2 अल्पवयीन मुलं आणि एका मुलीचाही समावेश आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’