सातारा प्रतिनिधी । शहरातील सदर बाजार परिसरात दोन दिवसापूर्वी झालेल्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून या चोरीप्रकरणी एका अल्पवयीन मुलासह तीन जणांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे. अनिल बापूराव मोहिते आणि शुभम अजय जाधव अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत.
राजेंद्र सोमनाथ मंजुळे यांच्या घराशेजारीच असलेल्या गॅरेजवर अनिल, शुभम आणि त्यांच्या एका अल्पवयीन मित्राने दरोडा टाकला होता. जवळपास २० हजार रुपयांचे सामान त्यावेळी चोरटयांनी पळवून नेले होते. या प्रकरणात कसून चौकशी केली असता पोलिसांना यातील अनिल मोहितेचा सुगावा लागला. पोलिसांनी आपला पॉलिसी खाक्या दाखवताच तिन्ही आरोपींची चोरी केली असल्याची कबुली दिली.