बागायतदार शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मुख्यमंत्री सौरकृषी पंप योजनेत ७.५ अश्वशक्तीचा पर्याय उपलब्ध; अर्ज घेणे सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

शेतीसाठी विनाव्यत्यय, शाश्वत व भारनियमन मुक्त वीज पुरवठा व्हावा म्हणुन राज्यात मागील दोन वर्षापासुन सुरु करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सोलर पंप योजना महाराष्ट्र 2020 शेतकऱ्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेत जिल्हानिहाय नियोजन करत आतापर्यंत ३ एचपी व ५ एचपी( अश्वशक्ती) चे पंप देण्यात येत होते. आता यात ७. ५ एचपी सौरपंप संच बसवण्यासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृती सुरु झालीय. Mukhyamantri Solar Pump Yojana 2020

मुख्यमंत्री सौरपंप योजनेत खुल्या प्रर्वगातील शेतकऱ्यांसाठी १०% तर आरक्षित प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी ५% लोकवाटा घेत कृषी सौरसंच बसवण्यात येत आहेत. पहिल्या टप्यात एक लक्ष सौर पंप संच बसवण्याचे महाराष्ट्र शासनाने निश्चित केले होते. शेतकरी वर्गातुन या योजनेस सकारात्मक प्रतिसाद मिळाला. मुबलक पाणीसाठा व जास्त जमीन धारणा असणाऱ्या बागायती शेतीसाठी जास्त दाबाने पाणी मिळावं अशी अनेक शेतकऱ्यांची इच्छा होती. ३ व ५ अश्वशक्ती सौरपंपामुळे अपेक्षीत पाणीउपसा मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचा हिरमोड झाला होता. अशा शेतकऱ्यांची ७ .५ अश्वशक्तीचा पंप मिळावा अशी मागणी होती. दरम्यान महावितरण कडून आता या योजनेतील शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता ७ .५ एचपी सौरपंप संचासाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केलीयं. परभणी जिल्ह्यातही हा पर्याय उपलब्ध झालयं. Mukhyamantri Solar Pump Yojana 2020

मुख्यमंत्री सौरकृषीपंप योजनेमधून मिळणाऱ्या या पंपसंचा साठी www.mahadiscom.in या संकेतस्थळावर जात पारेषण विरहीत विज पुरवठ्यासाठी लाभार्थी अर्ज पर्यायास स्पर्श करीत नवीन अर्ज करता येईल.
शेतक-यांनी सोबत लागणारे कागदपत्रे अपलोड करावीत.

Apply Online – Click Here

१) आधार कार्ड
२) ७ / १२ सातबारा उतारा तलाठी स्वाक्षरीत
३) आरक्षित प्रवर्गासाठी जात प्रमाणपत्र
४) लाईट बिल ( ग्राहक क्रमांक) शेजारील शेतकरी.
५) बोअरवेल , विहीर अथवा पाणीसाठा स्त्रोताची सातबाऱ्यावर नोंद.
७ .५ अश्वशक्ती कृषीपंपासाठी जमीन कमीतकमी ५ एकर पेक्षा जास्त जमीन धारणा असणे आवश्यक

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.