Garlic Side Effects : ‘या’ लोकांनी चुकूनही लसूण खाऊ नये, अन्यथा…

Garlic side effects
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या दैनंदिन जीवनात लसूण (Garlic)हा नेहमीचा लागणारा आणि रोजच्या वापरातील पदार्थ आहे. लसणाशिवाय कोणतीही भाजी किंवा आमटी तयार होऊ शकत नाही. त्यामुळे लसणाचे महत्त्व आनन्यसाधारण आहे. काहीजण तर आवडीने कच्चाच लसूण खातात. खरं तर लसूण खाल्ल्याने आपल्याला मोठे आरोयदायी फायदे होतात. परंतु, काही लोकांसाठी मात्र लसूण खाण हानिकारक (Garlic Side Effects) ठरू शकत.

ज्या लोकांना अॅसिडिटीचा (Acidity) त्रास आहे अशा लोकांनी लसूण खाणं टाळावं. लसूण खाल्ल्याने त्यांच्या छातीत जळजळ होऊ शकते. याशिवाय अॅसिडिटीचा त्रास असलेल्यां व्यक्तींनी रिकाम्या पोटी तर अजिबात लसूण खाऊ नये.

ज्या लोकांना नेहमी पोटाची समस्या असते अशा लोकांनीही लसणाचे सेवन करू नये, यामुळे तुमची समस्या आणखी वाढू शकते.

जर तुम्हाला खूप डोकेदुखी होत असेल तर लसणाचे सेवन करू नका. कच्चा लसूण तुमची डोकेदुखी वाढवू शकतो.

जर तुम्हाला श्वासाची दुर्गंधी आणि शरीराला घाम येण्याची समस्या असेल तर तुम्ही लसणाचे सेवन अजिबात करू नये. यामुळे तुमचा त्रास आणखी वाढू शकतो.

अनेक वेळा हृदयरोगी किंवा उच्च रक्तदाबाचे रुग्ण रक्त पातळ करण्यासाठी औषधे घेतात, अशा स्थितीत अशा व्यक्तींनी लसणाचे सेवन मर्यादित प्रमाणातच करा.