सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
ऊसतोड कामगारांच्या खोपीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील महागाव येथे घडली आहे. या दुर्घटनेत तब्बल 5 ते 6 खोपी जळाल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा तालुक्यातील महागाव येथे अजिंक्यतारा साखर कारखान्याच्या ऊसतोड कामगारांच्या टोळ्या शेतामध्ये वास्तव्याला आहेत. याच दरम्यान, काल दुपारच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन मोठी आग लागली होती. या गॅस सिलेंडरच्या स्पोटामध्ये 5 ते 6 खोपी , झोपड्या जळाल्या. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही.
ऊसतोड कामगारांच्या खोपीत गॅस सिलेंडरचा स्फोट ; 5 ते 6 झोपड्या जळाल्या#Hellomaharashtra pic.twitter.com/1WarR1qhL0
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) March 30, 2023
दरम्यान, या दुर्घटनेत ऊसतोड कामगारांच्या खोपींचे मात्र मोठे नुकसान झालेले आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंचे त्याचबरोबर मुलांची शिक्षणाच्या वस्तू ,कपडे, पैसे यांसारखे सर्व साहित्य जळून खाक झाले. कामगारांचे नुकसान झाल्याचे समजताच सामाजिक कार्यकर्ते रवी कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन तेथील लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केलं आहे.