सामान्यांसाठी दिलासादायक बातमी!! ऑक्टोबर महिन्यात असे असतील LPG घरगुती गॅसचे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सर्वसामान्य जनतेसाठी दिलासादायक बाब आहे. तेल मार्केटिंग कंपन्यांनी  (HPCL, BPCL, IOC) एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल केला नाही आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबरनंतर सलग तिसऱ्या महिन्यात एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीबाबत ग्राहकांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. दिल्लीमध्ये 14.2 किलोग्रॅम बिना सबसिडीच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 594 रुपयांवर स्थीर आहे. मुंबईमध्ये देखील या गॅस सिलेंडरची किंमत 594 रुपये आहे. दरम्यान 19 किलोग्रॅमच्या सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे.

याआधी जुलै महिन्यात 14 किलोग्रॅमच्या घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 4 रुपयांनी वाढवण्यात आली होती. जून महिन्यात 14.2 किलोग्रॅम बिना-सबसिडीचा सिलेंडर 11.50 रुपयांनी महागला होता.

19 किलोग्रॅमच्या घरगुती सिलेंडरच्या किंमतीत वाढ

दिल्ली- देशाच्या राजधानीत 19 किलोग्रॅम एलपीजी घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1133.50 रुपयावरून वाढून 1166 रुपये झाले आहे.

मुंबई-  मुंबईमध्ये या घरगुती सिलेंडरची किंमत 24.50 रुपयांनी वाढून दर 1089 रुपयांवरून 1113.50 रुपयांवर पोहोचले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like