हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे नाव देशातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहे. अंबानी कुटुंबाची श्रीमंती, त्यांचे थाट त्यामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. मात्र आता अंबानी कुटुंबाला मागे सारत गौतम अदानी कुटूंब पुढे आले आहे. उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. गेल्या 24 तासात गौतम अदानी यांच्या संपत्तीत 7.6 अब्ज डॉलरची वाढ झाल्यामुळे ते जगातील अब्जाधीशांच्या यादीत 12 व्या स्थानावर आले आहेत.
2024 वर्षात अदानी समूहाची सुरुवात दणक्यात झाली आहे. नुकत्याच ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, या वर्षांमध्ये गौतम आदमी यांच्या संपत्तीत 13.3 अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. यात गुरुवारी 7.67 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. त्यामुळे आता त्यांची एकूण संपत्ती 97.6 अब्ज डॉलर झाली आहे. यापूर्वी 2022 मध्ये गौतम अदानी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते.. त्यावेळी त्यांची संपत्ती 12.81 लाख कोटी रुपयांनी वाढली होती.
दरम्यान, गेल्या 24 तासात गौतम अदानी यांच्या संपत्तीत 7.6 अब्ज डॉलर्सची वाढ झाल्याने ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. मुख्य म्हणजे नव्या वर्षात त्यांनी मुकेश अंबानी यांना देखील मागे टाकले आहे. ब्लूमबर्ग बिलियनर्स इंडेक्सनुसार, गौतम अदानी यांनी सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत 12 व्या स्थानावर आले आहेत. तर मुकेश अंबानी हे 12 व्या स्थानावरून 13 व्या स्थानावर गेले आहेत. त्यामुळे याचा जोरदार झटका मुकेश अंबानी यांना बसला आहे.