हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओडिसा येथील 3 रेल्वेच्या महाभयानक अपघातामुळे (Odisha Train Accident) संपूर्ण देश हादरला आहे. या अपघातात आत्तापर्यंत 280 हुन अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला असून हजारो लोक गंभीर जखमी आहेत. देशातील या मोठ्या रेल्वे अपघाताच्या जखमा अजूनही ताज्या आहेत. या रेल्वे अपघातात अनेकांचे माता- पिता यांचा मृत्यू झाल्याने त्यांची मुले अनाथ झाली आहेत. याच अनाथ मुलांसाठी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी मोठी घोषणा केली आहे. अदानी यांनी या रेल्वे अपघातामुळे अनाथ झालेल्या मुलांचा शिक्षणाचा भार उचलला आहे.
गौतम अदानी यांनी याबाबत ट्विट करत म्हंटल की, ओडिसा रेल्वे दुर्घटनेमुळे आपण सर्वजण अतिशय दु:खी आहोत. या दुर्घटनेत ज्या निरपराधांचे आई-वडील गमावले आहेत, त्यांच्या शालेय शिक्षणाची जबाबदारी अदानी समूह घेणार असल्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना बळ देणे आणि मुलांना चांगले उद्या देणे ही आपल्या सर्वांची संयुक्त जबाबदारी आहे असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटल. अदानी यांच्या या निर्णयाने या बालकांच्या शिक्षणाचा भार नक्कीच कमी होणार आहे.
उड़ीसा की रेल दुर्घटना से हम सभी बेहद व्यथित हैं।
हमने फैसला लिया है कि जिन मासूमों ने इस हादसे में अपने अभिभावकों को खोया है उनकी स्कूली शिक्षा की जिम्मेदारी अडाणी समूह उठाएगा।
पीड़ितों एवं उनके परिजनों को संबल और बच्चों को बेहतर कल मिले यह हम सभी की संयुक्त जिम्मेदारी है।
— Gautam Adani (@gautam_adani) June 4, 2023
दरम्यान, शुक्रवारी 2 जून रोजी ओडिसा मधील बालासोर जिल्ह्यात ३ रेल्वे एकमेकांना धडकल्यामुळे हा अपघात घडला. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी संध्याकाळी बालासोर या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या अपघात स्थळाची पाहणी केल्यानंतर त्यांनी सांगितले की, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग मध्ये बदल झाल्यामुळे हा अपघात झाला. या अपघाताची सीबीआय चौकशी करण्यात येणार आहे.