Gautam Gambhir : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी निवड होताच गंभीरचं खास ट्विट; तुम्हालाही वाटेल अभिमान

Gautam Gambhir
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राहुल द्रविड यांच्यानंतर भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरची (Gautam Gambhir) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदी निवड कऱण्यात आली आहे. मागील काही दिवसापासून या पदासाठी गंभीरच नाव चर्चेत होते मात्र याबाबत अधिकृत घोषणा बीसीसीआयकडून कऱण्यात आली नव्हती. मात्र काल BCCI ने गौतम गंभीरची निवड जाहीर केली आहे. प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर गंभीरने ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 1.4 अब्ज भारतीयांची स्वप्न साकार करण्यासाठी मी सर्वकाही पणाला लावेन असं गंभीर म्हणाला.

काय आहे गंभीरचे ट्विट?

‘भारत ही माझी ओळख आहे, देशाची सेवा करणं हे माझ्या आयुष्यातील अभिमानाची बाब आहे. मला संघात वेगळ्या भूमिकेत पुनरागमन केल्याचा अभिमान वाटत आहे. प्रत्येक भारतीयाला हेवा वाटवा हेच माझं ध्येय आहे. 1.4 अब्ज भारतीयांची स्वप्न निळी जर्सी परिधान केलेल्या खेळाडूंच्या खांद्यावर आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सर्वकाही पणाला लावेन. ‘, असं गौतम गंभीरने ट्वीट करून सांगितलं आहे.

दरम्यान, गौतम गंभीरच नाव भारतीय क्रिकेटमध्ये नेहमीच आदराने घेतलं जाते. गंभीरने भारतासाठी 58 कसोटी, 147 वनडे आणि 37 टी20 सामने खेळले आहेत. गौतम गंभीरने कसोटीत 41.95 च्या सरीसरीने 4154 धावा केल्या. तर वनडेत 39.68 च्या सरासरीने 5238 धावा केल्या आहेत. तर टी20 क्रिकेटमध्ये 27.41 च्या सरासरीने 932 धावा केल्या आहेत. २०११ आणि २००७ चा विश्वचषक भारताने जिंकला या या दोन्ही वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात गौतम गंभीरनेच मॅच विनिंग खेळी केली होती. त्याने 4 डिसेंबर 2018 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला. आयपीएल मध्ये गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर होता. त्याचाच मार्गदर्शनाखाली यंदाची आयपीएल स्पर्धा कोलकात्याच्या जिंकली होती. त्यामुळे आता गंभीरच्या गळ्यात टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.