ज्यांची तू आयुष्यभर काळजी घेतलीस त्यांनीच तुझा विश्वासघात केला; शितल आमटेंच्या पतीची भावनिक पोस्ट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांनी गेल्या 30 नोव्हेंबरला आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येचे वृत्त समजताच संपूर्ण आनंदवन आणि कार्यकर्त्यांवर शोककळा पसरली होती. यासंदर्भात करजगी व आमटे कुटुंबियांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले होते. या पार्श्वभूमीवर डॉ. शीतल आमटे यांचा घातपात तर झाला नाही ना? असा संशय देखील व्यक्त केला जात होता.मात्र त्यांनी आत्महत्या केल्याचे तोासात निष्पण्ण झाले होते.

शितल आमटे यांचा २६ जानेवारी रोजी वाढदिवस असतो. यानिमित्त शितल यांचे पती गौतम करजगी यांनी एक भावनिक पोस्ट लिहिली आहे. ज्यांची तू आयुष्यभर काळजी घेतलीस त्यांनीच तुझा आणि माझाही विश्वासघात केला असं यामध्ये गौतम यांनी म्हटलं आहे.

गौतम करजगी यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट खालीलप्रमाणे आहे –

प्रिय शीतल (सोना), आज तुझा 40 वा वाढदिवस !
आता तू माझ्यापासून खूपच दूर गेली आहेस, पण खूप जवळ आहेस असा भास होतोय,
मला तुला मिठीत घ्यायचं आहे पण प्रिय,
मला अशा प्रकारे तुला शुभेच्छा द्याव्या लागतील अशी मी कल्पनाही केली नव्हती.

तू माझ्या सोबत नाहीस यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही. वयाच्या चाळीशीनंतर आपण आपलं जीवन कशा प्रकारे व्यतीत करायचं याच्या अनेक योजना बनवल्या होत्या. तु नेहमी म्हणायचीस की आयुष्यामध्ये वर्षांची भर घालण्यापेक्षा या वर्षांमध्ये आयुष्याची भर घालणे हे अधिक महत्वाचे आहे.

शीतल, तू माझ्या आयुष्यातील चमकता तारा आहेस आणि यापुढेही राहशील. मला तू आनंदवनाची ओळख करुन दिलीस आणि खऱ्या अर्थाने अर्थपूर्ण जीवन कसं जगायचं ते सांगितलंस. तू एक उत्कृष्ट मुलगी, मित्र, मार्गदर्शक, आई आणि पत्नी होतीस. तू बाबा आमटे आणि ताईंच्या तत्वांची खरी अनुयायी होतीस. ज्यांची तू आयुष्यभर काळजी घेतलीस त्यांनीच तुझा आणि माझाही विश्वासघात केला याची मला सल आहे. तुझ्यापासून सुटका करण्यात ते यशस्वी झालेत पण ते तुझ्यापासून आनंदवनाला बाजूला काढू शकणार नाहीत. आनंदवनात बाबा आणि ताईंच्या नंतरची जागा तू कमावली आहेस.

आज तुझ्या वाढदिवसानिमित्त मी तुला वचन देतो की, तुला जसं अपेक्षित होतं तसंच मी शर्विलला वाढवीन, त्याचं संगोपन करेन.. जीवन जगताना तू ज्या मूल्यांचं जतन केलंस ती मूल्ये त्याच्यातही उतरतील याची काळजी घेईन. मला आशा आहे की तू अशा कुटुंबात पुनर्जन्म घेशील ज्यांना आपल्या मुलीबद्दल काळजी आहे, आणि तुला तुझ्या आई-वडिलांकडून अपेक्षित सर्व प्रेम आणि माया मिळेल.

मी तुझी सदैव वाट पाहीन..
तुझाच,
गौतम.

https://www.facebook.com/gautam.karajgi.7/videos/2957278391215035

Leave a Comment