सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगड येथील मोलेश्वर या गावानजीक असलेल्या खोल विहरित काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास रानगवा पडला. महाबळेश्वर तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत असून काल रात्रीपासून हा गवा पाण्याने साचलेल्या विहरित अडकून पडला आहे. वनविभाग घटनास्थळी रिकाम्या हातांनी दाखल झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, महाबळेश्वर तालुक्यात मोलेश्वर येथे काल सायंकाळी गवा विहिरीत पडला आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी रिकाम्या हातांनी दाखल झाले आहेत. वन विभागाकडे भुलीचे इंजेक्शन नसल्याने ते पुण्याहून मागवण्यात येणार आहे. तोपर्यंत हा गवा पाण्यात अडकून पडणार असल्याने वन विभागाच्या ढिसाळ कारभारवर नागरिकांच्यातून तसेच प्राणी प्रेमीच्यातून संताप व्यक्त केला जात आहे.
महाबळेश्वरला गवारेडा विहिरीत पडला अन् वनविभाग रिकाम्या हातांनी पोहचले@HelloMaharashtr pic.twitter.com/acEu7FJ6Go
— Vishal Vaman Patil (@VishalVamanPat1) July 15, 2022
प्रतापगड रेस्क्यु सर्च टीम आणि वन विभाग गव्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. परंतु मुसळधार कोसळत असलेल्या पाऊसामुळे गव्याला बाहेर काढण्याच्या कार्यात अडथळा निर्माण होत आहे. जेसबीच्या सहाय्याने गव्याला बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती प्रतापगड रेस्क्यु सर्च टीमचे सदस्य मृणाल उतेकर यांनी दिली.